अलिबाग 

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळांनी नुकत्याच संपन्न झालेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन सहभाग घेतला होता या मध्ये घवघवीत यश संपादन केले.

शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० वर्षातील रायगड जिल्ह्यातील आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात अलिबाग तालुक्यामधून पीएनपी माध्यमिक शाळा वेश्वी-गोंधळपाडा, उरण तालुक्यामधून पी.एन.पी. माध्यमिक शाळा मोठी जुई, मुरुड तालुक्यातील पी.एन. पी. माध्यमिक शाळा काकळघर आदि शाळांनी व विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.

अलिबाग मध्ये २९ व ३० नोव्हेबर रोजी विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले होते यामध्ये प्रतिकृती, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ५ ते ८ वी गटामध्ये वकृत्व स्पर्धेत शुभम खरात याने प्रथम क्रमांक पटकाविला तर ९ ते १२ वी या गटामध्ये पुजा शेंडगे हिने वकृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. ९ ते १२ वी या गटामध्ये प्रतिकृती स्पर्धेमध्ये पुजा शेंडगे, राजसी सुंकले यांना उत्तेजनार्थ बक्षिश मिळवले.

मुरुड येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन विहूर येथे आयोजित करण्यात आली होती. मुरुड तालुक्यातील पी.एन. पी. माध्यमिक शाळा काकळघर शाळेतील प्राथमिक गटात  प्राची जाधव व पार्थ कांबळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला व वैष्णवी नागवकर हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच  अदिती मांडवकर हीने निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला.

उरण तालुक्यात ३ व ४ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या पी.एन. पी. माध्यमिक शाळा मोठी जुई तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला होता. श्रुष्टि पाटील हिने विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच शाळेतील सहशिक्षक शशिकांत रघुनाथ पाटील यांनी विज्ञान विषयातील शैक्षणिक घटकावर आधारित पट्टी प्रोजेक्ट तयार करण्यात आला होता या प्रोजेक्टला प्रथम क्रमांक मिळाला.

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे, पी.एन. पी. वेश्वी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, पी.एन. पी. माध्यमिक शाळा मोठी जुई मुख्याध्यापक किशोर भोईर, काकळघर शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना मेहतर आणि सहशिक्षकांचे संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी अभिनंदन केले. 

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी