कर्जत- दि.9

              कर्जत तालुका शिक्षक साहित्य संस्थेतर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा वदप येथे वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रप्रमुखा अरुणा गंगावणे, साधनव्यक्ती मालू गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष किशोर म्हात्रे, मुख्याध्यापक मोहन खरात, संघटनेचे राज्य प्रतिनिधी भगवान घरत, संजय देशमुख, मुजीब मुल्ला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

              प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले, यानंतर मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष किशोर म्हात्रे सरांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव माधवी कोसमकर यांनी केले.यानंतर भाषण व निबंधस्पर्धा घेणेत आली. यामध्ये भाषण स्पर्धेत लहान गटात गौरी शिंदे- प्रथम, साक्षी मुने बार्णे -द्वितीय, सानिका लांगे - तृतीय  आली आहे. निबंध स्पर्धा लहान गटात तेजल वाडेकर-प्रथम, मनाली मुने -द्वितीय, रिया भोईर- तृतीय आली आहे.

             मोठा गट भाषण स्पर्धेत तेजस्विनी ठमके- प्रथम, जागृती ढाकवळ-द्वितीय, राज मिसाळ-तृतीय, मोठा गट निबंध स्पर्धेत प्रणय मुने- प्रथम, सानिक मिसाळ -द्वितीय, दिपा कोशिरे -तृतीय आली आहे, याशिवाय उत्तेजनार्थ निर्जला लांघे, स्विटि भोईपोई, वैदेही क्षिरसागर यांनी बक्षिसे पटकावली आहेत.

अवश्य वाचा