चिपळूण

चिपळुनातील गोवळकोट येथे असलेल्या ऐतिहासिक गोविंदगडावर जाण्यासाठी रास्ता व्हावा यासाठी नगर परिषद, करंजेश्वरी देवस्थान, राजे प्रतिष्ठान  अनेक वर्षे प्रयत्न करतायत, याच गडाजवळ पालिकेची पाणी पुरवठ्याची टाकी आहे, काही अज्ञातांनी या टाकीजवळून गडावर जाणारा रस्ता 4 फुटाने खणला, यामुळे करंजेश्वरी देवस्थान कमिटी, गड प्रेमी आणि गोवळकोट ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होतेय.काही वर्षांपूर्वे ग्लोबल चिपळूण टुरिझम च्या पुढाकाराने पालकमांत्रि रवींद्र वायकर यांनी या गोविंदगडाच्या रस्त्यासाठी निधी ही मंजूर केला परंतु या रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने काही ग्रामस्थानी या रस्त्याला विरोध केला.काल सायंकाळी यापैकीच काही लोकांनी याबरस्त्यावर 4 फुटाचे 4 चर पडून रास्ता खणून काढल्यामुळे ग्रामस्थ चिडले आहेत. याबाबत नगर पालिकेत कळवले असता नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर खोदकाम पालिकेच्या जागेत झाल्याने चिपलूण नगर परिषद प्रशासन आता कायदेशीर कारवाई करेल अशी माहिती नग्रध्यक्षांनी दिली गडाकडे जाणारा रास्ता खोदल्याने नागरिकांमधूम तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

अवश्य वाचा