चिपळूण 

येथील कापसाळ मध्ये असणाऱ्या एसीबी इंटरनॅशनल प्लेस स्कूल मध्ये दिनांक ५ डिसेंबर आणि ७ डिसेंबर रोजी हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच मुलांच्या क्रीडा शिक्षणालाही फार महत्त्व आहे. मैदानी खेळातून आज देशात अनेक खेळांमध्ये मुलांनी देशाचे नाव जगात उंचावले आहे. एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासोबतच क्रीडा शिक्षणाला फार महत्त्व दिले जाते. भविष्यातही मुलांच्या विविध खेळांना प्राधान्य देऊन येथे शिक्षण घेणारी मुलं क्रीडा क्षेत्रात एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे नाव उज्वल करतील असे प्रतिपादन एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन अमोल चंद्रकांत भोजने यांनी केले. एसीबी इंटरनॅशनल स्कूल कापसाळ आणि एसीबी प्ले स्कूल मार्कंडी मुलांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा एसीबी इंटरनॅशनल स्कूल कापसाळच्या भव्य पटांगणावर संपन्न झाल्या. गुरुवार दिनांक ५ डिसेंबर रोजी एसीबी प्ले स्कूलच्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या तर रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेला व्यासपीठावर एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन अमोल चंद्रकांत भोजने,जयंद्रथ खताते, चंद्रकांत भोजने, सायली अमोल भोजने, गुणवत्ता अधिकारी नेहा महाडिक, मुख्याध्यापक राकेश भुरण, मुकुंद ठसाळे आदी मान्यवर उपस्थित होते. एसीबी प्ले स्कूलच्या एलकेजी, युकेजी नर्सरी मधील मुलांच्या क्रीडा स्पर्धा गुरुवारी संपन्न झाल्यानंतर इंटरनॅशनल स्कूल कापसाच्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांच्या क्रीडा स्पर्धा शनिवारी संपन्न झाल्या. चमचा घोटी, बुक बॅलन्स, धावणे, इंडोर गेम, क्रिकेट, खोखो, रस्सीखेच, बॉल फेक, धावणे, संगीत खुर्ची, अडथळा शर्यत स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या मुलांना चेअरमन अमोल भोजने यांच्या हस्ते गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्कूलच्या वतीने मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शारीरिक बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष लक्ष दिले जात आहे. स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमात सर्व वर्गातील विद्यार्थी पालक प्रतिनिधी यांचा सत्कार सायली भोजने आणि राकेश भुरण यांच्या हस्ते करण्यात आला. संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिवेक्षक, क्रीडा शिक्षक मुकुंद ठसाळे आणि क्रीडाशिक्षक पंकज बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद यांनी विशेष मेहनत घेतली.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग