चिपळूण 

   अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ४ व ५ डिसेंबर २०१९ रोजी लक्ष्‍मीबाई मारुतीराव बांदल इंग्लिश मीडियम स्कूल चिपळूण येथे करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लक्षवेधी उपकरणे निवडली होती.

     सदर प्रदर्शनामध्ये जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचलित सुमन विद्यालय,टेरव तालुका चिपळूणच्या विद्यार्थ्यांमार्फत कुमार रोशन रामचंद्र पंडव व कुमार अभिषेक अनंत कदम यांच्या " बहुउद्देशीय पाण्यातील सोबती" तसेच कुमारी मीजबा इक्बाल  बेबल ,कुमारी सानिका विजय चाळके, कुमारी स्नेहा अनिल मोहिते यांच्या" धूर धुक्यातील वाहतुकीचा दीपस्तंभ "या उपकरणांची मांडणी केली होती. सदर राज्यस्तरीय प्रदर्शनांमधून अतिशय अटीतटीच्या स्पर्धेत कुमार रोशन रामचंद्र पंडव व कुमार अभिषेक अनंत कदम यांच्या उपकरणाला संपूर्ण राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला व सदर उपकरणाची दिनांक १८ डिसेंबर २०१९ ते १९ डिसेंबर २०१९ या कालावधीत आईसर विज्ञान संस्था पुणे येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे सदर यशस्वी विद्यार्थ्यांना राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूरचे श्री अवसारे साहेब ,रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष श्री. इनामदार सर अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनचे जनरल मॅनेजर श्री. नितीन देसाई साहेब, चिपळूण तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री मोहन पाटील ,तसेच श्री दीपक म्हात्रे, श्री विनायक वैद्य, केंद्रप्रमुख सौ सायली शिंदे विस्तार अधिकारी श्रीमती खडस मॅडम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले सर्व यशवंत विद्यार्थ्यांना विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री. अमोल टाकळे, मुख्याध्यापक श्री मंदार सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.

     सदर उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष श्री. रमाकांत मोरे तसेच सर्व संचालक मंडळ चिपळूण संगमेश्वरचे नवनिर्वाचित आमदार श्री शेखरजी निकम, श्री मिलिंद कापडी डाऊ एग्रो केमिकल्स व अगस्त्या फाऊंडेशनचे पदाधिकारी ,चिपळूण तालुका मुख्याध्यापक संघटना, चिपळूण तालुका व रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ ,चिपळूण तालुका व रत्नागिरी जिल्हा गणित मंडळ प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक ग्रामस्थ व अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...