महाड-दि.८ डिसेंबर 

महाड शहर आणि तालुक्यांतील कांही गावांतुन मटका आणि जुगाराचे अवैद्य धंदे राजरोज सुरु असल्याची माहिती महाडशहर पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी धडक कारवाई करुन शहरांतील मटका आणि जुगाराचे अड्डे उध्वस्त केले.येथील कांही तथाकथील पत्रकार या अवैद्य धंद्यांना पोलिसां कडून अभय मिळावे या करीता प्रयत्न करीत असल्याची चर्चा संपुर्ण शहरांमध्ये केली जात असताना पोलिसांनी अचानक मटका धंद्यावर छापे मारुन गुन्हे दाखल केले आहेंत.अश्या प्रकारच्या कारवाया सातत्याने केल्या जातात परंतु राजकीय हस्तक्षेप वारंवार केला जात असल्याने शहरांतील अवैद्य धंदे पुर्णपणे बंद करणे अवघड होत असल्याची पोलिसां मध्ये केली जाते.

महाड तालुक्यांमध्ये हायप्रोफाईल हॉटेल पासुन गल्ली बोळा पर्यत मटका जुगाराचे धंदे राजरोज सुरु असतात,अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाचे अधिकारी कर्मचारी शहराला भेट देऊन जातात परंतु कारवाई केली जात नसल्याची चर्चा शहरांमध्ये केली जाते.शहरांतील शिवाजी चौक,एसटी बसस्थानक,जुना गाडी तळ,मच्छी मार्वेâट या परिसरांमध्ये गेल्या अनेक वर्षा पासुन अवैद्य धंदे केले जातात.हा परिसर म्हणजे बेकायदेशीर धंद्याचे ठिकाण म्हणुन ओळख झाली आहे.शहर पोलिसां कडून या धंद्याच्या विरोधांत कडक कारवाई केली जाते परंतु केलेल्या कारवाया तात्पुरत्या असल्याने पुन्हा अवैद्य धंदे सुरु केले जातात.शहरांमध्ये अवैद्य धंदे सुरु करण्यासाठी कांही तथाकथीत पत्रकार देखिल प्रयत्नांमध्ये असल्याची चर्चा शहरांमध्ये केली जात आहे.

मटका जुगाराच्या धंद्यातुन कष्ट न करता दर दिवशी हजारो रुपयांची कमाई केली जाते परंतु त्याच बरोबर अनेकांचे संसार उध्वस्थ होतात,शहरांमध्ये अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी वांरवार नागरिकां कडून केली जाते परंतु धंदे बंद होण्या ऐवजी त्या मध्ये वाढ झालेली अनेकदा आढळून येते.रायगड जिल्हा पोलिस प्रमुख डॉ.अनिल पारसकर यांनी या जिल्ह्याचा पदभार स्विकारल्या पासुन जिल्ह्यां मध्ये अवैद्य धद्यांवर थोड्या फार प्रमाणांमध्ये नियंत्रण आले असले तरी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पुन्हा धंदे सुरु करण्याचा प्रयत्न होताना दिसुन येतो.महाड शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक पी.बी.अवसरमल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शनिवारी सायकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नगरपालिकेच्या गाळ्या मध्ये सुरु असलेला मटका आणि जुगाराच्या धद्यावर छापा मारला.या वेळी ३ हजार ९१० रुपये रोख,मटक्याच्या वह्या,मोबाईल फोन या साहित्यासह दिनेश बाबु चिविलकर वय ३९ रा.नवे नगर महाड याला अटक केली.दरम्यांन धंद्याचा मालक अनंत पांडुरंग पवार हा फरारी झाला असुन पोलिस त्याचा तपास करीत आहेंत.या प्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्या मध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम १९८८ चे कलम १२ (अ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी