मुरूड दि.८ 

        रविवार दिनांक १/१२/२०१९ रोजी सायन धारावी क्रीडा संकुल येथे पारा पडलेल्या शालेय क्रीडा खेळात मुरुडच्या कराटे पट्टुंनी चमकदार कामगिरी करत एक सुवर्ण, तीन रौप्य, चार कास्य पदकांची लयलूट केली. यामध्ये हेमंत अडसुळे याने प्रथम क्रमांक पटकावित एक सुवर्ण पदक कमावून दिल्याने त्याची पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

        नुकत्याच पार पडलेल्या सायन, धारावी क्रिडा संकुल येथे जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत रायगड तर्फे "दि रायगड डिस्ट्रीक सिकई मार्शल आर्ट असोशियन" च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत एक सुर्वण तिन रौप्य चार कास्य पदकांची कमाई केली. या मध्ये १) हेमंत अडसुळे सर. एस. ए. हायस्कूल मुरुड याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाची कमाई केली याची पालघर येथे होणा-या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. २) तन्वी म्हात्रे रौप्य पदक माध्यमीक विद्यालय काशिद, ३) प्रियांका राठोड रौप्य पदक माध्यमीक विद्यालय काशिद, ४) अनुराज लाडघरकार रौप्य पदक सर. एस. ए. हायस्कूल मुरूड, 5) अनुज भोईर कास्य पदक श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय नांदगाव, 6) नेहल घोले कास्य पदक माध्यमिक विद्यालय काशीद, 7) पायल राठोड कास्या पदक माध्यमिक विद्यालय काशीद, 8) शिवम धी. सिंह कास्य पदक मेहबूब हायस्कूल विहूर, या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत प्राविण्य मिळविले आहे.

        या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कराटे स्पर्धेसाठी हेमंत अडसुले याने रायगड जिल्ह्याचे प्रत्निधित्व केले आहे. या स्पर्धेसाठी राज्यातून २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, उपनगर इ. जिल्ह्यातून शालेय क्रीडा पट्टू सहभागी झाले होते. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी "रायगड डिष्ट्रिक सिकाई मार्शल आर्ट असोशियान" या संस्थेचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक रेंशी विजय च. तांबडकर व साहाय्यक प्रशिक्षक सेंपाय सनी रा. खेडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.