खांब-रोहे,दि.८

     १२ डिसे.रोजी होणा-या आंबेवाडी पं.समिती गणाच्या पोटनिवडणूकीसाठीच्या प्रचारात आता रंग भरू लागला असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप व मित्रपक्ष आघाडीच्या उमेद्वार सिद्धी राजिवले यांच्या निवडणूक प्रचारार्थ आंबेवाडी-कोलाड नाक्यावर घेण्यात आलेल्या प्रचार सभेला मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.

       हाँटेल मराठा पँलेस येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या प्रचार सभेप्रसंगी आघाडीचे विनोद पाशिलकर,विजय मोरे,नारायण धनवी,मोतीराम तेलंगे,शंकर म्हसकर,सुरेश महाबळे,बाबूराव बामणे,राजेश सानप,वसंत मरवडे,शिवराम महाबळे, मनोहर महाबळे,नंदकुमार कापसे,संजय मांडलुस्कर आदींसह मोठ्या संख्येने आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

         यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांनी खा.सुनील तटकरे, आ.अनिकेत तटकरे, आ.आदिती तटकरे यांनी आणलेल्या विकासकामांमुळे आंबेवाडी पं.समिती गणातील प्रत्येक गावांचा चांगल्या पद्धतीने विकास झाला आहे. तर या मतदार संघातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपल्याला सिद्धी राजिवले यांना पं.समितीच्या पोटनिवडणूकीत आघाडीतर्फे भरघोस मतानी निवडून द्या.अशाप्रकारचे अवाहन शेवटी मतदारांना केले.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.