पंढरपूर 

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आर. आर. बी मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रेल्वे (असिस्टंट लोको पायलट) पदासाठीच्या परिक्षेत यश संपादन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

  आर. आर. बी. मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या असिस्टंट लोको पायलट पदासाठीची परिक्षा ही एकुण तीन टप्प्यात घेण्यात आली होती. या परिक्षेसाठी २६००० जागेसाठी देशभरातुन २० लाख अर्ज दाखल झाले होते. या मधून पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेतलेले कुमार योगेश टरले, अक्षयकुमार सावंत इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील प्रवीण इंगवले, गोविंद खरात या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

     पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी  महाविद्यालयाचे प्राचार्य वेळोवेळी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करीत असतात याशिवाय महाविद्यालयात स्पर्धा परिक्षेविषयी तज्ञांचे मार्गदर्शन शिबिर घेतल्याने आम्ही या परिक्षेत यश प्राप्त करू शकलो असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

  निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश  करांडे, डॉ. रवींद्र व्यवहारे, प्रा. अतुल आराध्ये, प्रा. समीर कटेकर, डाॅ. स्वानंद कुलकर्णी इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. गुगुलाथ चंदुलाल, प्रा. गिड्डे यांनी आभार मानले.

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...