पंढरपूर

        गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूरमध्ये  संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ हे मार्गदर्शन करत होते.   

           प्रारंभी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ म्हणाले की ,‘जगातील कोणत्याही माणसाने एवढे वाचन केले नसेल इतके वाचन भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी केले आहे. त्यांनी अनेक पदव्या संपादित केल्या असून जगात एवढ्या पदव्या अद्याप पर्यंत कोणीही घेतलेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा भारतानेच नव्हे तर संपूर्ण जगाने स्विकार केला आहे.’ असे सांगून अनेक महत्वाच्या घटना सांगितल्या. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील म्हणाले की, ‘डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारी अशी आहे.’ असे सांगून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रा, सुरज रोंगे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर.आर. गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. डी.एस. चौधरी, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर.पाटील, मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा. सचिन सोनवणे, कॉम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. भुवनेश्वरी मलेनिमठ, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, अमोल चंदनशिवे यांच्यासह अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार यांनी सूत्रसंचालन केले.

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...