कर्जत - दि.8 

            कर्जत मधील रेम्बो बुडोकॉन कराटे अकॅडमीच्या तेरा खेळाडूंनी मोठे यश संपादन केले आहे, दिल्ली येथे झालेल्या पहिल्या एशियन ओपन कराटे कप स्पर्धेमध्ये 4 सुवर्ण, 5 रौप्य,14 कास्य पदके व बेस्ट टीम ट्रॉफी पटकावली आहे. या सर्व खेळाडूंची निवड दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.

          विजयी स्पर्धक सुजल भोईर-1 कास्य, धीरज कांबळे-1 सुवर्ण व कास्य, तन्मय पाटील-1 सुवर्ण व 1 रौप्य, सुरज दातीर-2 कास्य, यश भोसले- 1रौप्य, साहिल पवार- 2 कास्य, गौरव नरे-1 रौप्य व 1कास्य, ध्रुव परदेशी-1 सुवर्ण व 1 रोप्य, आशितोष ताम्हाणे-2  कास्य, भूषण बडेकर-2 कास्य, विशाल गायकवाड-1 ररौप्य, नरेश बडेकर-2 कास्य, वसंत शेट्टी-1 सुवर्ण व 1 रौप्य पदक  पटकावली आहेत.

            हे सर्व स्पर्धक रेम्बो अकॅडमी कर्जत येथील शनि मंदिर देवस्थानच्या सभागृहामध्ये वसंत शेट्टी, नरेश बडेकर, विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.