हैद्राबाद बलात्कारातील आरोपींना एन्काउंटर करून यमसदनी पाठवणाऱ्या पोलिसांचे देशभरातून कौतुक होत आहे. एन्काउंटर खोटे होते कि खरे याविषयीचा न्यायालयातील निकाल येईल तेव्हा येईल; मात्र जनतेच्या न्यायालयाने या न्यायाला आज तरी सर्वोच्च स्थानी बसवले आहे आणि अशा न्यायाची जनतेला यापुढेही अपेक्षा आहे. गुन्हेगारी कृत्यांना चाप बसण्यासाठी आणि गुन्ह्यांची मीमांसा करून गुन्हेगारांना दंडित करण्यासाठी न्यायपालिका देशात कार्यरत आहे; मात्र न्यायपालिकेचा रटाळ कारभार, यादरम्यान गुन्हेगारांना पुरावे नष्ट करण्यास मिळणारी मोकळीक, पोलीस व्यवस्थेतील भ्रष्टाचार यांमुळे उशिरा मिळाला नरी तो न्याय असेलच याची शाश्वती नसते.  आजमितीला कोणतेच क्षेत्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेले नाही. बलात्कारासारख्या घटनांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा मिळण्याचे प्रमाण तर अगदीच नगण्य आहे, परिणामी गुन्हेगारांमधील भय लुप्त होत चालले असून अशा स्वरूपाचे गुन्हे गेल्या काही वर्षांत कमालीचे वाढले आहे. रांझेगावच्या पाटलाने एका अबला स्त्रीवर अत्याचार केल्याचे कळताच  छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात पाय तोडण्याचे आदेश देऊन अशा गुन्ह्यांविषयी रयतेमध्ये कायमस्वरूपी भय निर्माण केलेच शिवाय स्वराज्यातील स्त्रियांनाही सुरक्षित केले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये तत्परतेने आणि कठोर शासन केले गेले तरच गुन्हेगारांमध्ये भय निर्माण होते, हेच या प्रसंगातून सिद्ध होते. त्यामुळे स्त्री अत्याचाराचा चढता आलेख थांबवायचा असेल तर हैद्राबाद सारखे आणखी २-४ एन्काउंटर देशभरातून व्हायला हवेत ही सामान्य जनतेची प्रामाणिक इच्छा आहे !

 

अवश्य वाचा