नेरळ,ता.8

                            नेरळ येथे राहून आपण मंत्रालतात गृह विभागात अव्वल सचिव आहोत असे भासवून अनेकांची फसवणूक करण्याची घटना घडली आहे.त्या तोतया अधिकाऱ्याने सरकारी नोकऱ्या लावण्यासाठी तसेच बदल्या करण्यासाठी आणि विकास कामांना निधी मंजूर करून आणण्यासाठी लाखो रुपये लांबविले आहेत.दरम्यान,तो तोतया अधिकारी आपले पितळ उघडे पडण्याची शक्यता निर्माण झाल्यावर गेल्या चार महिन्या पासून फरार आहे,तर आरोपी असलेली पत्नी मात्र जाब विचारायला गेल्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे.याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात 190/2019खाली गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहेत.

                              2017 मध्ये संकेत वसंत कांबळे आणि यामिनी संकेत कांबळे हे दोघे नेरळ येथे यायचे.स्टेशन परिसरात स्वप्नील मधुकर लिंडाईत यांचे मेडिकल स्टोर असून सातत्याने त्याबाबत चौकशी करायचे.त्यानंतर ते कांबळे दाम्पत्य नेरळ मधील युवराज सोसायटी मध्ये राहायला आणि त्यांनी त्याच भागातील श्रावणसृष्टी सोसायटी मध्ये राहणारे स्वप्नील लिंडाईत यांच्याशी मैत्री झाली.दोघे एकमेकांच्या घरी जाऊ लागले आणि लढाई कधी बाहेर देखील एकत्र जाऊ लागले.दिवाळी 2017 मध्ये स्वप्नील लिंडाईत यांच्या घरी गेल्यावर कांबळे यांच्यासमोर लिंडाईत यांनी पनवेल तालुक्यातील शाळेत शिक्षिका असलेल्या बहिणीचे बदली चा विषय निघाला.त्यावेळी मंत्रालयात गृह विभागात अव्वल सचिव म्हणून अधिकारी असलेल्या तोतया अधिकारी कांबळे याने मंत्रालयात शिक्षण विभागात अधिकारी यांना फोन लावल्याचे दाखवून राज्याचे मुख्यमंत्री यांचे नावे मुंबई महानगरपालिका हद्दीत बदली साठी विनंती पत्र देण्याचे सूचना केली.त्यानंतर ती सूचना स्वप्नील लिंडाईत यांनी आपल्या मुंबई विक्रोळी येथे राहणाऱ्या बहिणीला कळविले.

                              त्या कामासाठी चार लाख रूपये लागतील असे सांगून एक महिन्याने कामासाठी त्यातील दोन लाख रुपये मंत्रालयात शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला देण्याचे असल्याने ते दोन लाख रुपये तोतया अधिकारी संकेत कांबळे याने आपली पत्नी यामिनी संकेत कांबळे यांचे नावे असलेल्या सारस्वत बँकेच्या खात्यात ट्रान्सफर केले.त्यांनतर त्या तोतया अधिकाऱ्याने स्वप्नील लिंडाइत कडे त्यांच्या बहिणीचे काम होण्यासाठी त्याचे डेबिट कार्ड वापरून आयफोन मोबाईल आणि महागडा घड्याळ घेतला,त्या सर्व वस्तूंचे दीड लाख रुपयांचे बिल लिंडाइत यांनी नेरळ मधील नक्षत्र टेलिकॉम या दुकान मालकाला आपल्या डेबिट कार्डाने दिले.मात्र एक वर्षे होत आले तरी मंत्रालयात काम करणारा तोतया अधिकारी कांबळे याच्याकडे स्वप्नील लिंडाइत यांनी आपल्या बहिणीच्या कामाबद्दल विचारणा केली.मात्र तुमचे काम प्रोसेस मध्ये असून लवकरच होईल असे सांगत होता.पण दिवस ढकलण्याचे काम कांबळे करीत होता.मात्र त्याचवेळी इकडे जानेवारी 2019 पासून आरोपी संकेत कांबळे याने नेरळ मधील अनेकांना सरकारी नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन पैसे उकळले आहेत.त्यांच्यासह तलावाचे काम करण्यासाठी, रस्त्याच्या कामाचा ठेका मिळवून देण्यासाठी लाखो रुपये उकळले आहेत असे नेरळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 190/2019 या खाली दाखल झालेल्या गुन्ह्यात स्पष्टपणे नोंदविले आहे.मात्र विनंती करून देखील बदली होत नाही आणि मागणी करून देखील आपले पैसे परत मिळत नाही.हे समजल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच स्वप्नील लिंडाइत यांनी नेरळ पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार केली आहे.

                           मात्र आपल्या बहिणीचे बदलीचे काम करण्यासाठी अडीच लाख रुपये आणि महागडे-मोबाईल खरेदी करण्यासाठी दीड लाख रुपये यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.नेरळ पोलीस ठाण्यात संकेत वसंत कांबळे आणि यामिनी संकेत कांबळे या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील हे अधिक तपास करीत आहेत.मात्र आरोपी संकेत कांबळे हा सप्टेंबर 2019 पासून फरार आहे,तर दुसऱ्या आरोपी यामिनी संकेत कांबळे या त्यांच्या घरी पैसे मागायला गेलेल्यांना त्यांनाच गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत.

 

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी