कूसुंबळे 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईद्वारा दिनांक 3/12/2019 ते 3/01/2019 या कालावधीत रायगड जिल्ह्यामध्ये 'न्याय आपल्या दारी' या संज्ञेअंतर्गत आयोजित फिरते लोकअदालत व कायदेविषयक शिबिर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग व ग्रुपग्रामपंचायत साळाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच साळाव येथे पार पाडण्यात आले.सदरील कार्यक्रम अध्यक्ष जि.वि.सेवा प्राधिकरण व प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अभय सो. वाघवसे, तसेच सचिव जि.वि.से. प्राधिकरण रायगड अलिबाग संदीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले होते.यावेळी सर्वप्रथम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग कार्यालयातून नियुक्त केलेले निवृत्त न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये, डॉ. निहा राऊत व इतर कर्मचारी वर्गाचे ग्रामपंचायत सरपंच यांनी स्वागत केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रशिक्षित स्वयंसेविका जीविता पाटील यांनी   कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी त्यांनी विधी सेवा प्राधिकरण करीत असलेल्या कामांची माहिती दिली व आज तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत विधी सेवांच्या मोफत योजनांची माहिती पोहोचावी या उद्देशाने सदरील फिरते लोकअदालत व कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. वकील अजहर घट्टे यांनी विधी सेवा प्राधिकरणा अंतर्गत येणा-या मोफत सेवांविषयी माहिती देत असताना मनोधैर्य योजना, शिष्यवृत्ती, लोकअदालत, मध्यस्थी प्रक्रिया इ. विषयी माहिती दिली. तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. निहा अनिस राऊत यांनी महिलांच्यासाठी असणा-या कायद्यांची माहिती देत असताना दैनंदिन जीवनातील उदाहरणे दिली व त्या माध्यमातून अतिशय सोप्या भाषेत महिलांना त्यांच्यासाठी असणारे कायदे समजावून सांगितले परंतू त्याच वेळेला या कायद्यांचा गैरवापर कसा होतो हे देखील समजावून सांगितले व कायद्याचा गैरवापर न करण्यासंबंधी सल्ला देण्यात आला. ज्येष्ठ विधिज्ञ कला पाटील यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याचे कौतुक करीत प्रत्येकाला कायदा जाणून घेण्याचा अधिकार असल्याचे सांगितले व प्रोत्साहनपर गीत गायले. निवृत्त न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांनी यावेळी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात कायदे हे तुमच्यासाठी आहेत आणी त्या कायद्यांविषयी जाणून घेण्याचा अधिकार सर्वसामान्य जनतेचा असल्याचे सांगून जास्तित जास्त लोकांनी या मोफत सेवांचा लाभ घ्यावा असे सांगण्यात आले.यावेळी पंचक्रोशीतील जवळ जवळ 60 महिला व पुरुष हजर होते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अलिबाग कनिष्ठ लिपिक प्रणीता मगर, शिपाई हर्षला तरे तसेच अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. सरपंच ग्रुपग्राम पंचायत साळाव यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वयंसेविका जीविता पाटील यांनी केले.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग