पनवेल 

            स्कुटीच्या डिक्कीतुन डयुप्लीकेट चावीच्या सहाय्याने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास तांत्रीक तपासाच्या आधारे तालुक्यातील आकुर्ली येथून रंगेहाथ अटक केली. विकास मोहन धोत्रे, वय ३७ वर्षे, रा. आकुर्ली गांव, ता. पनवेल, जि. रायगड असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर यापूर्वी नाशिक, मुंबई, नवीमुंबई येथे गुन्हे दाखल आहेत. यावेळी त्याला पकडल्यानंतर त्याच्याकडून ६१.२००/-रू. किं. १ ऍक्टिव्हा स्कुटी, ०२ समसंग व ०२ ओपो कंपनचे मोबाईल फोन, १ हेलमेट व ०४ ड्युप्लीकेट चाव्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक ईशान खरोटे, पोहवा दिलीप चौधरी, पोना पंकज पवार, पोना दिनेश जोशी, पोशि राहुल सांळुखे, पोशि अजय कदम, पोशि राजु खेडकर यांनी केली. यावेळी पकडण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इशांत खरोटे करीत आहेत. 

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी