पनवेल 

                वस्तू व सेवा कर (जीएसटी) बाबत व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात शहरातील खांदा कॉलोनी येथील कार्यालयात या विभागाचे अधीक्षक वसंत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी वस्तू व सेवा कर विभागाच्या मुख्य आयुक्त श्रीमती संगीता शर्मा तसेच सहाय्यक आयुक्त रामदास काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याठिकाणी पार पडलेल्या या शिबिरामध्ये शहरासह परिसरातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला. 

                 यावेळी जीएसटी म्हणजे नेमकं काय आणि जीएसटीबाबत आपण काय केलं पाहिजे, त्याचे फायदे किंवा तोटे काय आहेत याबाबत यावेळी मार्गदर्शन करताना उपस्थितांना माहिती देण्यात आली. यामध्ये जीएसटीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, भारतात एक जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी-१) हा एकच अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला. देशभरात एकसमान करप्रणाली असावी असा उद्देश यामागे होता. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारद्वारे त्यापूर्वी लागू असलेले अनेक अप्रत्यक्ष कर रद्द करून ही करप्रणाली भारतात लागू करण्यात आली. जीएसटी लागू करण्यासाठी भारताच्या राज्यघटनेत १२२ घटना दुरुस्ती करून नवीन कायदे करण्यात आले. 'गुड्स ॲन्ड सर्व्हिसेस काउन्सिल' ही मध्यवर्ती वैधानिक संस्था जीएसटीचे नियमन करते. केंद्रीय अर्थमंत्री हे या काउन्सिलचे प्रमुख आहेत. जीएसटी लागू करण्यासाठी ३० जून २०१७ च्या रात्री संसदेचे विशेष अधिवेशन झाले. त्यात राष्ट्रपतींनी मध्यरात्रीच्या सुमारास जीएसटी लागू झाल्याची अधिकृत घोषणा केली. यामध्ये सर्व वस्तू आणि किंवा सेवा यांची विक्री, हस्तांतर, वस्तुविनिमय, भाड्याने देणे किंवा आयात व्यवहारांवर जीएसटी लागू करण्यात येईल असे प्रसारमाध्यमांतून त्यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार या मार्गदर्शन शिबिरामध्ये जीएसटी रिटर्न कशा पद्धतीने केले जाते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.  

                देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर त्यापासून व्यावसायिकांना आलेल्या अडचणी, त्यातून वस्तू व सेवा कर विभागाच्या वतीने काढण्यात आलेले मार्ग आणि नव्याने या सेवा करात करण्यात आलेल्या सुधारणा याबाबत महत्वाचे मार्गदर्शन यावेळी व्यावसायिकांना लाभल्यामुळे त्यांना नव्याने जीएसटीमध्ये झालेल्या सुधारणा व सुविधा, व्यवहार सोयिस्कर ठरतील, असा विश्वास वाटत आहे. 

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग