पनवेल, दि.7 

बेकायदेशीररित्या परवाना नसताना टीव्हीएस कंपनीचे ट्रेडमार्क लावून ऑईल पॅकींग करीत असताना एका इसमास पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

तालुक्यातील हेदुटणे गाव दिपक फर्टीलायझर कंपनीच्या पाठीमागे असलेल्या एका गाळ्यात बेकायदेशीररित्या परवाना नसताना टीव्हीएस कंपनीचे ट्रेडमार्क लावून ऑईल पॅकींग करीत असल्याची खबर पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक विजय खेडकर व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी निकेश झा (23) याला ताब्यात घेतले असून त्या ठिकाणी असलेले बेकायदेशीर ऑईल पॅकींग हस्तगत करण्यात आले आहे. या संदर्भात टीव्हीएस कंपनीच्या वतीने सुद्धा पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. आरोपीस भादवी कलम 420, 486 सह व्यापार चिन्ह अधिनियम 1999 चे कलम 103, 104 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहा.पो.निरीक्षक विजय खेडकर करीत आहेत.

 

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी