पंढरपूर 

 पंढरपूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. पंढरपूर नगरपरिषदेचे मात्र या बाबीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. पुतळ्या भोवती दररोज होणाऱ्या अतिक्रमणाचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरवासीयांनी कडून होत आहे.

पंढरपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गजानन महाराज मठा लगत असणाऱ्या अहिल्या चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची दोन वर्षांपूर्वी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या पुतळ्यावरून या चौकास अहिल्या चौक हे नाव प्रचलित झाले आहे. पंढरपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भव्य पुतळे असून या पुतळ्यांच्या ठिकाणी नीटनेटकी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे थोर महात्म्यांच्या या पुतळ्यांचे पावित्र्य जपले जात आहे. परंतु अहिल्या चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या शेजारी होणारे अतिक्रमण, दररोजचा वाहनांचा गराडा यामुळे या पुतळ्याची अवहेलना झाल्याचे दिसत आहेत.

श्री विठ्ठलाच्या मंदिरापासून जवळ असणारा अहिल्या चौक नो पार्किंग झोन आहे. या चौकालगत पार्किंग स्थानक उभारण्यात आले आहेत. तरीही पुतळ्या भोवती दररोज उभारणाऱ्या ऑटो रिक्षा, चार चाकी वाहने, हातगाडी यामुळे पुतळ्यास कायमचा गराडा पडल्याचे दिसून येते. थोर महात्म्यांच्या पुतळ्यांचे पावित्र्य जपण्यासाठी नगरपरिषदेने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु आजपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या भोवती होणारे दररोजचे अतिक्रमण रोखण्यात पंढरपूर नगरपरिषद अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

 

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...