पंढरपूर 

भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणदिनानिमित्त पंढरीत  विविध  संघटना  आणि  संस्थांकडून  अभिवादन करण्यात आले . पंढरपूर नगरपरिषद आणि  विधानपरिषद सदस्य   आ. प्रशांत परिचारक आणि परिचारक समर्थकांनी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  महापरिनिर्वाण दिन  सबंध देशात  मोठ्या  उत्साहात साजरा केला जात आहे पंढरपूर येथे पंढरपूर नगरपरिषद आणि विधानपरिषद सदस्य प्रशांतराव परिचारक यांच्यासह समर्थकांनी परिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्यात हार घालून अभिवादन केले यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष सीलरत्न झेंडे, शहराध्यक्ष संतोष पवार, आरपीआयचे सुनील सर्वगोड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानूरकर यांचेसह नगरपरिषदेचे नगरसेवक उपस्थित होते.

 पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त प्रतिमा पुजन करण्यात आले मा.संतोष पवार रिपाई शहर अध्यक्ष पंढरपूर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा.साधनाताई भोसले,मुख्याधिकारी मा.मानोरकर साहेब, उपमुख्याधिकारी मा.सुनिल वाळुजकर साहेब,मा.उपनगराध्यक्ष मा.नागेश भोसले,रिपाई जि.अध्यक्ष मा.जितेंद्र बनसोडे,रिपाई प.महा.संघटक मा.बाळासाहेब कसबे,बांधकाम समीतीचे चेअरमन मा.सुजितकुमार सर्वगोड, पाणीपुरवठा चेअरमन मा.इब्राहिम बोहरी,पक्षनेते गुरूदास अभ्यंकर,नगरसेविका नडगिरे मॅडम व नगरसेवक ,कर्मचारी, व कार्यकर्त उपस्थित होते.

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...