नेरळ

कर्जत तालुक्यातील वरई आणि तिवरे या दोन ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका 8 डिसेंबर रोजी पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरई ग्रामपंचायत निवडणुकीत मारहाणीचा प्रकार घडला आहे. चार जणांना झालेल्या मारहाणीत कर्जत पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेने आज होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांना ग्रहण लागण्याचा प्रकार झाला आहे. 

 याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील वरई आणि तिवरे या दोन ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका उद्या 8 डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यातील वरई ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी सरळ लढत होणार आहे तर तेथील 9 सदस्य यांच्यासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी 16 जणांनी माघार घेतल्याने 9 सदस्य यांच्यापैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता केवळ 4 जागांसाठी निवडणूक होत आहे. वरई ग्रामपंचायत मधील प्रभाग तीन मधील सर्व तीन जागांसाठी निवडणूक होत असून सहा उमेदवार यांच्यात सरळ लढत होत आहे. या प्रभागातून दक्षता देशमुख या सर्वसाधारण महिला गटातून शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवीत आहेत. दक्षता देशमुख या दहिगाव, पोस्ट वेणगाव येथे आपले सासू सासरे, नवरा, तीन मुले व इतर नातेवाईक यांच्यासह राहतात. ८ डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान पार अडणार आहे त्यामुळे गेले काही दिवस गावात निवडणुकीचे वातावरण होते. अशातच निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास वरई गावातील लोक हे दहिगाव मध्ये आले. तेव्हा प्रमोद देशमुख यांना हि बाब समजल्यावर त्यांनी जाऊन संबंधितांना येथे का आले असे विचारले. 

 देशमुख यांनी विचारणा केल्यावर त्यातील शंकर भुसारी, दिपक भुसारी, रामदास, सचिन भुसारी, जितेंद्र उर्फ घारू  देशमुख, वसंत देशमुख, हर्षल उत्तम भुसारी यांनी प्रमोद देशमुख याना त्यांच्या गाडीवरून पडून मारण्यास सुरवात त्यानंतर त्या सर्वानी आपला मोर्चा देशमूख यांच्या घराकडे वळविला. त्यावेळी त्यांच्याकडे क्रिकेट खेळाचे स्टँम्प, लाकडी दांडके, लोखंडी रॉड अश्या हत्यारांनी त्यांनी दक्षता देशमुख, प्रिया देशमुख, या महिला मारहाण केली तर दैवत देशमुख याना केलेल्या मारहाणीत त्यांच्या हाताच्या बोटांवर लोखंडी रॉड चा जोरदार फटका बसला. त्याचबरोबर दक्षता देशमुख यांच्या सासूबाई उषा देशमुख या वयोवृद्ध महिला भांडणे सोडवण्यास गेल्या असता त्यांना संबंधितांकडून ढकलून देण्यात आले. या मारहाणीत देशमुख यांच्या  दुखापत झाली आहे तर महिलांच्या गळ्यातील दागिने गहाळ झाले आहेत. 

त्यामुळे त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची तक्रार दाखल केली आहे. निवडणूक काळात झालेल्या या मारहाणीची कर्जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली असून शंकर भुसारी, दिपक भुसारी, रामदास, सचिन भुसारी, जितेंद्र उर्फ घारू  देशमुख, वसंत देशमुख, हर्षल उत्तम भुसारी या सात जणांविरुद्ध भादंवि कलम 143,147148,149,324,323, 452,427,504,506,37(1),37(2) अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग