खेड 

घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ महापरिनिर्वाण दिन सुकिवली शाखा क्रमांक २५ यांच्या वतीने लुंबिनी बौध्दविहार येथे साजरा करण्यात येऊन या दिनानिमित्त बाबासाहेबांचे संकलित करण्यात आलेले दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनातून बाबासाहेबांना आगळे-वेगळे अभिवादन करत या छायाचित्रातून बाबासाहेबांचा संघर्षमय जीवनपटच उलगडला गेला.

सुकिवली बौध्द विकास मंडळ मुंबईचे सक्रिय सदस्य रविंद्र जाधव यांनी आपल्या संकल्पनेतून बाबासाहेबांचे संकलित केलेली दुर्मिळ छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. आगामी पिढीला बाबासाहेब कसे होते, त्यांचा लढा कसा होता? या इतिहासाची जणू पानेच या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनातून उलगडली गेली.  येथील शाखा गेली अनेक वर्षे सातत्याने  अनेक अभिनव उपक्रम राबवत असून या अभिनव उपक्रमाने ग्रामस्थ तसेच लहनगण्या ना दुर्मिळ छायाचित्रे भावून गेली

या छायाचित्र प्रदर्शनाचा ग्रामस्थ तसेच तरूणांचा चांगला प्रतिसाद लाभला. या निमित्ताने विविधांगी कार्यक्रम देखील पार पडले. छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शाखेचे माजी अध्यक्ष मनोहर जाधव यांच्याहस्ते पार पडले. तर दिप प्रज्वलन आत्माराम जाधव व महिला मंडळाच्या सौ मंगल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. छायाचित्र प्रदर्शनाकरिता शाखेचे अध्यक्ष विनोद शिर्के, संतोष जाधव, यांच्यासह सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...