रोहा अष्टमी
 
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कॉंग्रेस ,शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येवून भाजपाचा वारू रोखण्यासाठी सरकार स्थापन करत आहेत. मात्र रोहा पंचायत समिती आंबेवाडी पंचायत गणाच्या  पोटनिवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी हे तालुक्यातील आपली हाडवैराची परंपरा राखत आमने सामने उभे ठाकले आहेत.12 डिसेंबर रोजी होत असलेल्या या निवडणुकी करीता 4 डिसेंबर हा अर्ज मागे घेण्याचा अंतीम दिवस होता. राज्यातील बदलत्या सत्ता समिकरणांचे मुळे या ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेने मध्ये तडजोड होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र असे काहीही न होता दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार कायम ठेवले आहेत. मात्र मागील वेळच्या पराभूत व यावेळच्या बंडखोर राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्पिता अनंत थिटे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे येथे परंपरे प्रमाणे राष्ट्रवादी व शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे मध्ये झुंज होणार हे स्पष्ट झाले आहे.एकुणच राज्यातील महाविकास आघाडीच्या निमित्ताने नेते जरी एकत्र आले असले तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना  झुंजवत ठेवण्यातच हे नेते समाधान मानत असल्याचे समोर आले आहे.
12 डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते . गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी  झालेल्या छाननी मध्ये तीनही अर्ज वैद्य ठरले होते .बुधवार  4 डिसेंबर हि अर्ज मागे घेण्याचे  दिवशी अपक्ष उमेदवार अर्पिता अनंत थिटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सिद्दी संजय राजीवले व शिवसेनेच्या रिद्धी विजय बोरकर यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
24 ऑक्टोंबर रोजी विधानसभेच्या लागलेल्या निकालानंतर महिनाभर राज्यात सत्तास्थापनेचे नाट्य रंगले होते. यामध्ये दिवसागणिक राजकीय समिकरणे बदलत होती. अखेर भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी भिन्न विचारधारा असलेले शिवसेना , कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस व त्यांचे मित्र पक्ष हे एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रुपाने विस वर्षानी शिवसेनेचा व ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाला. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरही ह्याच महाआघाडीच्या सुत्रानुसार निदान या पाच वर्षात होणाऱ्या सर्व निवडणुका होणार असे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यानुसार आंबेवाडी पोटनिवडणुकीत हि जागा शिवसेनेला सोडली जाईल पुढे होणाऱ्या वरसे जिल्हा परिषद पोटनिवडणुकी मध्ये ती जागा राष्ट्रवादीला सोडावी अशी कार्यकर्त्यांची  भावना होती. मात्र आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दोन्ही पक्षातील वरिष्ठांनी समजून घेतल्या नसल्याचे दिसून आले आहे.
12 डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.गुरुवारी झालेल्या छाननी मध्ये तीनही अर्ज वैद्य ठरले असून 4 डिसेंबर हि अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यावेळी येथील सर्व निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
      
राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर होत असलेल्या पोटनिवडणुकी कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.राज्यपातळीवर वरीष्ठ नेत्यांचे मनोमिलन झाले असले तरी स्थानिक पातळीवर त्यांची काय भूमिका असेल हे स्पष्ट केलेल नाही.त्यामध्येच जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे  वरीष्ठ नेते सत्तास्थापना नाट्यात रंगले असल्यामुळे आंबेवाडी बाबत कोणताही निर्णय झाला नाही.शिवसेनेने या ठिकाणी विजय मिळविला होता म्हणून या पोटनिवडणुक हि जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सेनेला मिळावी असे शिवसैनिकांना वाटत होते.हे अर्ज दाखल करण्यापूर्वी न झाल्यामुळे सेना राष्ट्रवादी आमने सामने उभे ठाकले आहेत. गुरुवार 28 डिसेंबर रोजी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी मध्ये तीनही अर्ज वैद्य ठरले आहेत. त्यामुळे आता 4 डिसेंबर या अर्ज मागे घेण्याच्या तारखेला सेना , राष्ट्रवादी दिलजमाई न झाल्याने  व अपक्ष उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे आंबेवाडी मध्ये राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्ते  स्थानिक पातळीवर एकमेकांचे समोर उभे ठाकले आहेत.या लढाईत शिवसेना आपली मागील विजयाची परंपरा कायम राखते की राष्ट्रवादी पुन्हा आपला पारंपारीक गड मिळविण्यात यशस्वी होते हे 13 डिसेंबर च्या मतमोजणीत स्पष्ट होईल.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग