जगात सर्वत्रच कुठे नव्हे ते माथेरान हे एकमेव दुर्गम पर्यटनस्थळ आजवर अनेक प्रलंबित विकास कामांसाठी इथल्या खेकडा प्रवृत्तीच्या काही लोकांमुळे  विरोध करण्यात अव्वल स्थानावर असल्याचे मत येथील जेष्ठ नागरिकां मधून बोलले जात आहे.

मुळातच विकासापासून शापित असलेले हे गाव आजही जगातील अन्य पर्यटनस्थळाच्या तुलनेत खूपच पिछाडीवर पडलेले आहे त्याला अपवाद म्हणजे इथली गलिच्छ राजकीय संस्कृती कारणीभूत ठरत आहे. नगरपरिषद मध्ये सत्ता कोणत्याही पक्षाची असो. ज्यांनी ज्यांनी या गावाला विकसनशील पर्यटन केंद्र बनविण्यासाठी मेहनत घेतली आहे त्यांना अद्याप यश मिळाले नाही. त्यातच इथल्या विविध पॉइंट्सच्या सुशोभीकरणासाठी कधी नव्हे ते मालवाहतूक करण्यासाठी एमएमआरडीए ला जिल्हाधिकारी यांनी मर्यादित काळासाठी ट्रॅक्टरची परवानगी दिली होती. महत्वाच्या पॉइंट्स वर ग्याबियन वॉल बांधण्यात येणार होत्या जेणेकरून पावसाळ्यात मातीची धूप होणार नाही.त्यामुळे या महत्वाकांक्षी कार्यासाठी स्थानिक अश्वपाल संघटनेचा सुध्दा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे समजते.

  परंतु केवळ होणाऱ्या कामांमुळे आपल्या वाट्याला भविष्यात काहीच कामे उरणार नाहीत. त्यामुळेच होत असणाऱ्या विकास कामांना नाहक विरोध करण्यासाठी काही राजकीय मंडळींनी ज्यांच्यामुळे गावाच्या प्रतिमेला तडा जात आहे अशांना पाठीशी घालून त्यांच्या मार्फत विकासाला चालना देण्या ऐवजी विरोधात उभे ठाकले आहेत. इथली बहुतांश मंडळी ही स्वयंघोषित इंजिनियर असल्याप्रमाणे वावरत असून एमएमआरडीए माध्यमातून होणाऱ्या कामांतून सत्ताधारी गटाला लाभ मिळू शकतो या अनुषंगाने विरोध करण्यास सुरुवात केल्यामुळे तुर्तासतरी ट्रॅक्टर द्वारे मालवाहतूक बंद करण्यात आली आहे.

पर्यटनाच्या आधारावर इथले सर्वांचे जनजीवन अवलंबून आहे याची जाणीव विरोधकरणाऱ्या मंडळींनाही ज्ञात आहे. परंतु या गावाला पूर्वापार विकास कामांचा जणूकाही शाप असल्याने हे क्षेत्र भविष्यात तरी विकासाच्या दिशेने आगेकूच करेल अशी शाश्वती दिसत नाही.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग