पंढरपूर

   पंढरपूर येथील६५ एकर परिसरात श्री लक्ष्मी नारायण महा यज्ञ ,श्री मद भागवत कथा अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि ६डिसेंबर ते १४डिसेंबर या कालावधीत हा सोहळा संपन्न होत आहे.अशी माहिती जयपूर येथील गणपती विश्वनाथ शास्त्री यांनी दिली. शुक्रवार दि ६डिसेंबर रोजी सकाळी ८वा चंद्रभागा नदी शोभायात्रा  काढण्यात येणार आहे. ही यात्रा श्री विठ्ठल मंदिर, नामदेव पायरी ,प्रदक्षिणा मार्ग  येथून ६५एकर परिसरात सकाळी१०वाजेपर्यंत येईल.यात ५००भक्तगण,१५०पंडित सहभागी होणार आहेत. पंढरी नगरी मध्ये होणाऱ्या अष्टोत्तर १०८श्री लक्ष्मीनारायण महा यज्ञ व भागवत कथा या धार्मिक सोहळ्या मध्ये उत्तर प्रदेश, बिहार,राजस्थान,मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातील हजारो भक्तगण सहभागी होणार आहेत. पंढरपूर शहरात प्रथमच एवढा भव्यदिव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. सलग ९ दिवस विविध भागवत कथेचे पवित्र श्रावण भाविकांना लाभणार आहे.जागतिक विश्व शांती, पर्यावरण समतोल,तसेच ईश्वरापर्यंत भक्ती पोचण्यासाठी अशा यज्ञाची आवश्यकता असते. जास्तीतजास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इचलकरंजी येथील गोविंद बजाज यांनी केले आहे.

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...