एका राजाची गोष्ट सांगायची झाली म्हणजे तुम्ही म्हणाल की आटपाट राज्य  असेल त्या राज्याचा एक राजा असेल, राजा म्हटलं की त्याला दोन राण्या आलयाच,.  (तसं आता दोन राण्या राजालाच असायला हव्यात असं कांही नाहीये) राजाचे नाव होते भुपेंद्र. तर त्या राजाला दोन राण्या होत्या  अर्थात एक आवडती आणि एक नावडती  असणारच ना ! आपल्याला त्या दोन राणयांबददल काय करायचे आहे म्हणा  ? त्या सुखाने नांदत होत्या एवढे पुरे. तर,पुढे काय झाले, गंमत झाली.गोष्टीत गंमत तर हवीच ना .राजाच्या पदरी ईतर राजांप्रमाणेच दरबारात राज गायक,संगीतकार,चित्रकार,अशी कलाकार, मंडळी होती.त्याबरोबरच उपेंद्र नावाचा मोठया लंबयाचौडया गप्पा मारणारा, मिशांवर ताव मारणारा हसता हसता गंभीरतेचा आव आणणारा एक लबाड विदुषक राजाच्या पदरी होता. तो नकला करायचा, राजाची करमणूक करायचा.  मोठा हुषार.राजा त्याला ओळखून होता पण तसे दाखवायचा नाही. त्याला राजाचे वैभव ,मान सन्मान  पाहून हेवा वाटे. त्याला राजाच्या मस्तकावरील राज मुकुट पाहून मत्सर  वाटे. आपणही राजा व्हावे आणि  राज मुकुट मस्तकावर धारण करावा असे वाटे. आपल्यालाही मान सन्मान मुजरा मिळावा अशी तीव्र इच्छा त्याच्या मध्ये निर्माण झाली. हळू हळू राज्यही मिळावे आणि आपणच राजा व्हावे असे त्याला वाटू लागले. पुर्वी कसे शेजारी शेजारी  राज्ये असत (जसे शेजारी मगध देशाचा राजा राज्य करीत असे असायचे) तसेच या राजाच्या शेजारी बाराबुध्दी नावाचे एक राज्य होते. त्या राज्याचा राजा होता बुध्दीराज. हा राजा चलाख तर होताच पण अत्यंत महत्वाकांक्षी होता. भुपेंद्र राजावर त्याचा राग होता. त्याचे राज्य आपलयाला मिळावे अशी त्याची ईच्छा होती. तो उपेंद्र विदुषकाला ओळखत होता. त्याने ऊपेंद्रशी मैत्री केली, आणि  भुपेंद्र राजाच्या मसतकावरील राज मुकुट त्याला मिळवून देण्याचे कबूल केले. झाले विदुषक खुष झाला. बुधदीराजाशी त्याने मैत्री केली. त्याला बुधदीराजाचया मदतीने राज्य ही मिळणार होते आणि राजमुकुटही.

बुधदीराजाने विदुषकाला एक दिवस भुपेंद्र राजा दरबारात असताना त्याचा मुकुट त्याच्या मस्तकावरून हिसकाऊन घेण्यास सांगितले.  विदुषकच तो. त्याने तो हिसकाऊन घेतला आणि आपल्या डोक्यावर ठेवला आणि नाचत सुटला. राजा मीच ! मला मुजरा करा असे सांगत सुटला. भुपेंद्र राजाला , विदुषकाचा राग आला. त्याने शिपायाला धाडले आणि तो मुकुट परत मिळवला. पण बुधदीराजाचया सांगण्या प्रमाणे विदुषकाने मोठ मोठ्याने ओरडत "राजा भिकारी माझा मुकुट घेतला "ढुम ढुम ढुमाक ढूम "असे ढोलकी बडवत नाचत तो लोकांना सांगू लागला. भुपेंद्रराजाला भिकारी म्हटल्याने राग आला, आणि  त्याने तो मुकुट त्या विदुषकाला परत देऊन टाकला.

पुन्हा विदुषक मोठ मोठ्याने ओरडत नाचत लोकांना सांगू लागला , राजा मला घाबरला , माझा मुकुट परत केला, ढूम ढूम ढुमाक ढूम  ! लोकांना कळेना की मुकुट कोणाचा ? कोण घाबरले ? आणि विदुषकाला राज मुकुट कसा मिळाला  ? हे सगळे बुधदीराजा गंमतीने पहात होता. विदुषकाला हाताशी धरून बुधदीराजाने राज्य तर मिळवलेच, राजमुकुटही मिळवला फक्त तो विदुषकाचया डोईवर ठेवला. विदुषकाला वाटले आपण राजा झालो., आणि एक चलाख ,  बुध्दीराजा  ही गंमत पहात विदुषकाचे नामधारी असलेले राज्य पाहू लागला. विदुषकाला राज्य कसे करायचे हे ठाऊक नव्हते.नकला करणे, मनोरंजन करणे हे त्याचे काम.

बुधदीराजाचया तालाने चालायचे आणि राजा असल्याचा आव आणत काम करायचे असे विदुषकाने ठरविले. कसा राजयकारभार होणार प्रजेला चिंता लागून राहिली.बुधदीराजाला गंमतच बघायची होती. तुम्हीच ठरवा आता राजा कसा असावा ते ! बुधदीराजासारखा  लबाड संधीसाधू  की भुपेंद्रसारखा भोळासांब  ? की विदुषकासारखा नामधारी  ? राजा मला घाबरला ! ढूम ढूम ढूम ढुमाक ढूम !असे ओरडत नाचणारा.!

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...