बेळगाव,दि.५-

जिल्ह्यातील गोकाक,अथणी आणि कागवाड मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले.जिल्ह्यात ७४.७२ इतके मतदान झाले.अथणीमध्ये २१९८३१,कागवाड १८६१९० आणि गोककमध्ये २४४३१३ इतके मतदार आहेत.संध्याकाळी सहापर्यंत ७३.०८ गोकाकमध्ये मतदान झाले.१७५५५४ गोककमध्ये मतदान झाले.अथणीत७५.२३ टक्के झाले.१६५३७० मतदारांनी अथणीत आपला हक्क बजावला.कागवाडमधे ७६.२७ टक्के मतदान झाले.१४२००२ मतदान कागवाडमध्ये झाले.सकाळपासून दुपारपर्यंत मतदान अधिक झाले.अपंग व्यक्तींना मतदान केंद्रात स्काऊट,एन सी सी च्या छात्रानी मदत केली.मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गोकाकमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या प्रकाश नाशिपुडी हा मद्यधुंद अवस्थेत मतदान केंद्रावर दाखल झाला.त्यावेळी तेथील लोकांच्या लक्षात ही बाब आल्याने त्याला तपासणीसाठी दवाखान्यात नेले पण त्याने तेथून पळ काढला.या शिक्षकाला निलंबित करण्यात आले.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी