नवी दिल्ली

सन २००४ मध्ये भारत देश अन्नधान्याची आयात करणाऱ्या देशांपैकी एक होता. २०१४ पर्यंत आपला देश खा. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात निर्यात करणारा देश झाला. मात्र आज पुन्हा कांद्याची आयात करावी लागते, हे दुर्दैवी आहे, असे म्हणत खा. सुनिल तटकरे यांनी आज लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले. 

केंद्र सरकारकडून मदतीचा हात पुढे न झाल्याने आज राज्यात शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. अन्नधान्याची निर्यात करणाऱ्या देशात आज पुन्हा कांद्याची आयात करावी लागते, हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. लासलगावच्या कांदा उत्पादकांना योग्य वेळी मदत पोहोचली असती तर राज्यावर आयातीची वेळ कधीच आली नसती, असेही ते म्हणाले. 

फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या की पुढची पाच वर्ष त्यांचं नुकसान भरून निघत नाही. माझ्या मच्छिमार बांधवांना ४ महिने झाले, अवकाळी पावसामुळे होडी पाण्यात सोडता येत नाही. यांची नुकसानभरपाई सरकार कधी देणार आहे, असा प्रश्न खा. तटकरे यांनी आज सभागृहात उपस्थित केला.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी