मुंबई, ५ डिसेंबर २०१९: 

भारताची सर्वात मोठी आणि एकमेव नफा करणारी पेमेंट बँक पेटीएम पेमेंट्स बँक लि, (पीपीबी)ने इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटचा प्रसार झपाट्याने होण्यासाठी लोकांना सुलभतेने फास्टॅग खरेदी करता यावे यासाठी देशभरात ७५० केंद्रे सुरू केली आहेत. प्रत्यक्ष टोल प्लाझावर २५० केंद्रे उभारली असून इतर ५०० केंद्रे मुंबई, पुणे, दिल्ली-एनसीआर, बंगळूर, हैदराबाद, चंदिगड, चेन्नई आणि जयपूर सारख्या २० शहरांमधील कॉर्पोरेट कचे-या, निवासी सोसायट्या आणि पार्किंग लॉटमध्ये उभारली आहेत.

सर्व प्रमुख शहरांत व गावांत ३५०० व्यवसाय प्रतिनिधी नेमून पीपीबी फास्टॅगच्या विक्रीला आणखी वेग देत असून भारतात फास्टॅगचे वितरण करण्यात आघाडीवर आहे. आगामी महिन्यांमध्ये ३ दशलक्षपेक्षा जास्त वाहनांना फास्टॅगने सुसज्ज करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. या व्यतिरिक्त या बँकेने आत्ताच भारतातील ११० पेक्षा जास्त टोल प्लाझांचे अधिग्रहण केले आहे आणि येत्या वर्षात आणखी १०० प्लाझांचे अधिग्रहण करण्याची त्यांची योजना आहे.

फास्टॅग हा एक साधा व पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोगा टॅग आहे, जो रेडियो-फ्रिक्वन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीवर चालतो. पेटीएम पेमेंट्स बँकेने नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन योजनेचा चा एक भाग म्हणून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह भागीदारी केली आहे. यामुळे पेटीएम फास्टॅगचा उपयोग करून महामार्गावरील टोलवरून विनाविलंब प्रवास करता येईल.

अवश्य वाचा