नागाव सरपंच श्री. निखिल नंदकुमार मयेकर व सर्व नागाव ग्रामस्थ यांच्या एसटी बस चालू होण्याच्या प्रयत्नांना यश.
आज सकाळी आम्ही नागाव ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व मी स्वतः सौ.हर्षदा निखिल मयेकर,अलिबाग एसटी आगारात जाऊन तेथील अधिकारी श्री. मांढरे साहेब व बर्वे साहेब यांची भेट घेतली. त्यानी आपल्याला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आमच्या समवेत एक सर्व्हीस एसटी बस सोबत चाचणी केली.

सदर चाचणी आक्षी स्तंभ येथे सुरू झाली मग शिंत्रे गल्ली(आक्षी) ,रायवाडी, नागाव हायस्कूल, भीमेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,नागाव ग्राम पंचायत ऑफिस,प्रधान आळी, सिद्धिविनायक मंदिर,वैद्य आळी, सोनार पेठ यामार्गे गेलो .
विशेष म्हणजे नागाव हटाळे येथें आज गुरुवार चा आठवडा बाजार जिथे प्रचंड गर्दी असते तिथेसुद्धा मुद्दामहू या रस्त्यावर परीक्षण करण्यात आले की कोणता अडथळा येतोय का ते...

मी स्वतः व आम्ही सर्व ग्रामस्थ एसटी बस मध्ये एस टी महामंडळ अधिकार्यांसमवेत आक्षी पासून बसून पाल्हे बायपास पर्यंत पाहणी केली की बसगाडी चालु असताना कोणते अडथळे येतात ते..
बऱ्याच ठिकाणी विजेच्या खांबावर असलेल्या तारा बस च्या वर काही भागात स्पर्श होतात..तसेच काही ठिकाणी व्यवस्थित दोन एसटी बस एकाच वेळी पास होतायेत..
तर आजच्या या सर्वेक्षण वरून एसटी महामंडळ, अलिबाग आगार येथील अधिकारी त्यांचा अहवाल  लवकरच त्यांच्या वरिष्ठ मंडळाकडे सादर करणार आहेत..जेणेकरून लवकर नागवच्या रस्त्यावरून एसटी बस धावायला चालू होतील...

अवश्य वाचा