जेएनपीटी दि५

            पत्नीचा खून करून आत्महत्या असल्याचे भासविणाऱ्या पती विरोधात तब्बल चार महिन्यानंतर उरण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शंकर बीरा सरगर रा. डाऊरनगर, उरण असे या आरोपीचे नाव आहे. सध्या शंकर सरगर हा आरोपी फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

            मुळचा जत, सांगलीचा राहणारा असणारा शंकर त्याची पत्नी पुजा सरगर (२५) हिच्या सोबत डाऊरनगर येथे भाड्याने राहत होता. १८ ऑगस्ट २०१९ ला पती पत्नीत किरकोळ कारणांवरून भांडण झाले यामध्ये शंकर ने पुजाचा गळा आवळून खून केला आणि आत्महत्या केली असल्याचा भासविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना या बाबत संशय आल्याने त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुजाचा मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शव विच्छेदन अहवालात आणि फॉरेन्सिक चाचणीमध्ये पुजाचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिल्यानंतर उरण पोलिसांनी पती शंकर सरगर (२८) याच्याविरोधात भा.द.वि. कलम ३०२ नुसार खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

     मात्र शंकर सरगर हा फरार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. या बाबत उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अतुल अहेर हे अधिक तपास करत आहे.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी