पंढरपूर 

पंढरीतील जुनी पेठ परिसरातील भुयारी गटारींचे काम अपुर्ण राहिल्यामुळे गटारी ओव्हरप्लो होऊन परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत असे. यासंदर्भात माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक विक्रम शिरसट यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असुन सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी निधीस मंजुरी मिळवुन आणल्याने आता या कामास सुरुवात झाली आहे. नुकतीच या कामाची पाहणी माजी  नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केली. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे ही उपस्थित होते.

जुनी पेठ परिसरातील, अनिल नगर, मटण मार्केट, रामबाग, कॉटेज हॉस्पिटल, कोळी गल्ली, सरकारी दवाखाना परिसर, गोविंदपुरा या परिसरातील  नागरिक अपुर्ण गटारींच्या कामामुळे त्रस्त होते. या भागात कायमच गटारी तुंबल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले असे. अनेक नागरिकांच्या घरात पावसाळ्यात गटारीचे पाणी शिरत असे. नागरिकांच्या आरोग्याचा ही गंभीर  प्रश्‍न निर्माण झाला होता. याचे गांभीर्य लक्षात घेवुन नगरसेवक विक्रम शिरसट यांनी येथील अपुर्ण गटारींचे कामे पुर्ण होण्यासाठी आमदार प्रशांतराव परिचारक व  प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हे काम मार्गी लागले असुन लवकरच हा प्रश्‍न सुटणार आहे.

भुयारी गटार योजनेअंतर्गत पंढरीतील या कामासाठी एकुण 62 कोटी रुपयांचा निधी आमदार प्रशांत परिचारक यांनी मंजुर करुन आणला. या कामाचे तिसर्‍या टप्प्यातील अंतीम काम आता होत आहे. पंढरीतील  भिंगे चौक ते जुनी  नगरपालिका भुयारी गटारीची 700 मिमि. व्यासाची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. 

अवश्य वाचा