नेरळ,ता.5

                           नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत खांडा विकास आघाडीचे सदस्य आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते शंकर किसन घोडविंदे यांची निवड झाली. त्यांनी शिवसेना पक्षाचे सदस्य धर्मानंद यशवंत गायकवाड यांच्या 10 विरुद्ध 8 मतांनी पराभव करून विजय मिळविला.ता निवडणुकीत शिवसेनेने भाजप बरोबर सार्वत्रिक निवडणुकीत असलेली युती तोडून स्वतःच्या ताकदीवर उपसरपंच पदाची निवडणूक लढविली. मात्र त्यात शिवसेनेला अपयश आल्याने सेनेच्या उमेदवार यांचा हा विद्यमान आमदार महेंड थोरवे यांना मोठा धक्का मानला जात आहे, त्याचवेळी सत्ताधारी गटाला देखोल धक्का मानला जात आहे.

              नेरळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी आज 5 डिसेंबर रोजी रोजी निवडणुक घेण्यात आली. अध्यासी अधिकारी ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा यांच्याकडे निर्धारित वेळेत मंगेश म्हसकर, प्रथमेश मोरे,धर्मानंद गायकवाड आणि शंकर घोडविंदे यांनी आपले अर्ज दाखल केले होते. मात्र त्यातील मंगेश म्हसकर आणि प्रथमेश मोरे यांनी आपले नामांकन अर्ज निर्धारित वेळेत मागे घेतले.त्यामुळे उपसरपंच पदासाठी धर्मानंद गायकवाड आणि शंकर घोडविंदे यांचे नामांकन अर्ज शिल्लक राहिल्याने दुपारी दोन वाजता उपसरपंच पदासाठी निवडणुक घेण्यात आली.गुप्त पध्दतीने मतदानाची मागणी केल्यानंतर गुप्त मतदान घेण्यात आले.त्यात शिवसेनेचे धर्मानंद गायकवाड यांना 10 तर खांडा विकास आघाडी चे शंकर घोडविंदे यांना 8 एवढी मते मिळाली.त्यामुळे अध्यासी अधिकारी रावजी शिंगवा यांनी नेरळ ग्रामपंचायत म्हणून -- हे निवडून आल्याचे जाहीर केले. उपसरपंच पदाच्या निवडणूक प्रक्रियेत अध्यासी अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी संजय राठोड यांनी सहकार्य केले.या विशेष सभेला सदस्य मंगेश म्हसकर,उषा पारधी,नितीन पारधी,धर्मानंद गायकवाड, श्रद्धा कराळे,रोहिणी पवार,शारदा साळेकर,शंकर घोडविंदे,अतुल चंचे,ज्योती मानकामे,रेणुका चंचे,गीतांजली देशमुख,राजेंद्र लोभी,संतोष शिंगाडे,उमा खडे,प्रथमेश मोरे,शिवाली रासम हे सर्व सदस्य उपस्थित होते.

              नवनिर्वाचित उपसरपंच शंकर घोडविंदे यांचे अभिनंदन करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे,समाजकल्याण सभापती नारायण डामसे, राष्ट्रवादीचे माजी सरपंच भगवान चंचे,शेकाप तालुका चिटणीस प्रवीण पाटील,भाजप चे नितीन कांदळगावकर,राजेश भगत, यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष,भारतीय जनता पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.