चिपळूण 

नगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांची ज्येष्ठ नगरसेवक सुधीरशेठ शिंदे , नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष करामतशेठ मिठागरी, तसेच माजी उपनगराध्यक्ष व  नगरसेवक कबीरशेठ काद्री ,उमदे नेतृत्व असणाऱ्या पाणी सभापती संजीवनी शिगवण,तसेच धडाडीच्या विद्यमान आरोग्य सभापती नगरसेविका सफाताई गोठे यांच्या समवेत भेट घेतली. चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी यावेळी गटनेतेपदी सुधीरशेठ शिंदे यांची निवड हि अतिशय महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.  भविष्यात काँग्रेसला १०० टक्के सुगीचे चांगले येणार हे त्यांच्या निवडीवरून दिसून येत आहे.तसेच सुधीरशेठ शिंदे ज्येष्ठ नगरसेवक आहेतच सोबतच त्यांना सर्व क्षेत्रातील अनुभव असल्याने त्याचा पक्षवाढीसाठी नक्कीच उपयोग होणार आहे.

सुधीरशेठ हे चिपळूण अर्बन बँकेत १५ वर्षे  डायरेकटर व व्हाईस चेअरमन होते.तसेच १४ वर्षे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.त्याचसोबत काँग्रेसच्या पडत्या काळात ५ वर्षे काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवून चिपळूण तालुक्याचा कायापालट करून दाखवणारे नेतृत्व आहे व हे जगजाहीर आहे.एकंदरीत चिपळूण मध्ये काँग्रेस पक्षाला चांगले दिवस असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अवश्य वाचा