मुंबई  दि. ४ 

मुंबई पोर्ट स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड आयोजित आखिल भारतीय प्रमुख बंदर टेबल टेनिस, शरीर सौष्ठव आणि वेट लिफ्टिंग स्पर्धेचा उदघाटन सोहळा दिनांक ०४ डिसेंबर २०१९ रोजी मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय श्री वनगे साहेब यांच्या हस्ते, ऑफिसर रिक्रिएशन क्लब, माझगाव येथे संपन्न झाला. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्री कमलेश मेहता ( अर्जुन पुरस्कार प्राप्त ) उपस्थित होते.त्यावेळी त्यांनी टेबल टेनिस मधील भारताने घेतलेल्या भरारी  बद्दल माहिती देऊन स्पर्धकांच्या मनात जोश निर्माण केला. मुंबई पोर्ट ने चेन्नई पोर्ट वर ३-० असा दमदार विजय मिळवून स्पर्धेची शानदार सुरवात केली. पंकज कडू वि. जॉन बॉस्को ३-१, सुनील केळकर वि. पि. व्ही  राघवन ३-०, संजय पाटणकर वि. टि. पि. श्रीधर ३-०.

दीनदयाल पोर्ट वि. न्यू मंगलोर पोर्ट ३-१. महेश हिंगोरानी वि. श्री. खान ३-०, मनीष हिंगोरानी पराभूत मनोज वर्गीस १-३, नरेश बांभनी वि. श्रीनिवास मूर्ती  ३-०, महेश हिंगोरानी वि. मनोज वर्गीस ३-०.

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...