बेळगाव,दि.४

           पोटनिवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघात गुरुवारी मतदान होणार असून मतदानासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे.गोकाक,अथणी आणि कागवाड  या तीन विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.मतदान यंत्रासह ,निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदारसंघात रवाना झाले आहेत.

                   प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी एक मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.या सखी मतदारसंघात प्रवेशद्वारावर महिलेचा पुतळा ठेवण्यात आला आहे.सखी मतदारसंघात सगळे कर्मचारी महिलाच असणार आहेत.या मतदान केंद्रात सजावट देखील करण्यात आली आहे.मतदानासाठी येणाऱ्या महिला सोबत येणाऱ्या लहान मुलांसाठी एका स्वतंत्र खोलीची सोय करण्यात आली आहे.या खोलीत मुलांना खेळण्यासाठी खेळणी देखील ठेवण्यात आली आहेत.पिण्याचे पाणी,शौचालय,अपंगांसाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...