खरोशी 

   वक्रतुंड मित्र मंडळ पेणचे संस्थापक अध्यक्ष दत्ता कांबळे यांनी आपली मुलगी पार्थिवी हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पेण तालुक्यातील वरसई येथील आदिवासी विभागाच्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला वाॅटर फिल्टर कुलर भेट दिला.

    या वेळी वक्रतुंड मित्र मंडळाचे अध्यक्ष दत्ता कांंबळे, तरणखोप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नारायण पाटील, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, राजु कांबळे, साधना कांबळे, राजश्री कांबळे, मुख्याध्यापक डी.जी.पाटील, सुहास पाटील, सारिका पाटील, आदिसह शाळेचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे हे आपला व आपल्या मुलांचा वाढदिवस हा हेल्मेट वाटप, आश्रमशाळेला वॉटर कुलर भेट देऊन, आदिवासी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून व विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करतात. हा समाजापुढे आदर्श असून दत्ता कांबळे यांना सामाजिक जाण असल्याने आपल्या मुलीचा वाढदिवस इतरत्र साजरा न करता येथील मुलासोबत साजरा करुन येथील मुलांची गरज लक्षात घेता शाळेला वाॅटर फिल्टर कुलर व खाऊ देवुन येथील आदिवासी मुलांची मुख्य गरज भागविली आहे. हे त्यांचे कार्य उल्लेखनिय असल्याचे अनेकांनी सांगितले शाळेचे मुख्याध्यापक डी.जी.पाटील यांनी शाळेच्या वतीने आभार मानले.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.