बेळगाव,दि.३-

   काही दिवसांपूर्वीच बेळगाव पोलिसांनी उघडकीस आणलेले हनी ट्रॅप प्रकरण ताजे असतानाच बेळगावात आणखी एक हनी ट्रॅप प्रकरण उघडकीस आले आहे.हनी ट्रॅप करून दरोडा पैसे लुबाडण्याचा  प्रयत्न करणाऱ्या एक अल्पवयीन मुलगा, दोन महिला आणि दोन पुरुषांना   माळमारुती पोलिसांनी गजाआड केले आहे.कपड्याचे व्यापारी असणारे एम.एम.मुजावर आणि बीबी आयेशा अब्दुल सत्तार शेख यांच्यात आर्थिक व्यवहार होता.मुजावर याना बीबीने सहा लाख रुपये द्यायचे होते.मुजावर हे महांतेश नगर स्टेट बँकेत आपल्या व्यवहारासाठी गेले होते.त्यावेळी दोन महिला त्यांच्या कार जवळ येऊन थांबल्या होत्या.बँकेतून बाहेर पडताच बीबी आयेशा आणि हिना या दोघीनी मुजावर यांना   तुमचे द्यायचे पैसे घरात  आहेत .घरी चला तुमचे पैसे देतो असे सांगितले.

   त्याप्रमाणे  पैसे आणण्यासाठी मुजावर त्यांच्या घरी गेले होते यावेळी घरात अगोदर दोन व्यक्ती आणि एक अल्पवयीन मुलगा होते.घरात प्रवेश केल्यावर मुजावर  यांना बळजबरीने घरातील व्यक्तींनी नग्न करून त्यांच्याकडे  असलेले १६५००  रुपये आणि  घड्याळ काढून घेतले .नग्नावस्थेतील मुजावर यांचा व्हीडिओ काढून आम्हाला पाच लाख रुपये दे नाहीतर तुझ्यावर बलात्काराची केस दाखल करतो म्हणून धमकी दिली.एव्हढेच नाही तर सोशल मीडियावर तुझा व्हीडिओ व्हायरल करतो अशीही धमकी दिली.घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या  मुजावर  यांनी मी आता अडीच लाख रुपये बँकेतून काढून आणतो व  देतो असें सांगून तेथून  सुटका करून घेतली.

   तेथून बाहेर पडताच मुजावर यांनी माळ मारुती पोलीस स्टेशन गाठले .तेथे त्यांनी लगेच तक्रार दाखल केली. माळ मारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी ही घटना ए सी पी नारायण बरमणी यांना कळवली.त्यांच्या नेतृत्वाखाली धाड घालून सगळ्यांना अटक करण्यात आली.आरोपीं कडून१६५०० रोख रक्कम, घड्याळ, व्हीडिओ काढण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.पोलिसांनी अटक केलेल्यांची नावेआलिशान शहाबुद्दीन सय्यद रा.काकर स्ट्रीट कॅम्प,अखिल अल्लाबक्ष बेपारी रा.काकर स्ट्रीट कॅम्प,सलमान गुलाज बेग रा.जाफर स्ट्रीट कॅम्प, श्रीमती बीबी आयेशा अब्दुल सतार शेख रा. महंतेशनगर,हीना अखसर सावनूर रा.रूक्मिणी नगर बेळगाव अशी आहेत.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.