पाताळगंगा २ डिसेंबर,

          भात कापणी झाल्यानंतर शेतकरी वर्ग आपल्या शेतामध्ये कडधान्ये पिकांची लागवड करी असतात.यामधून उत्पन्न मोठ्याप्रमाणावर मिळत असून शेतकरी वर्गांस अधिक नफा प्राप्त होत असतो.यामुळे कृषी खाते वेळोवेळी शेतकरी वर्गास सहकार्य करीत असतात. महाराष्ट्र शासन कृषी विभाग पुढाकरांने तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून खालापूर तालुक्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून शेतकरी  वर्गांस तालुक्यात २४०० की. हरभरे यांचे बियाने वाटप तसेच खते आणी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

             शेतकरी वर्गांस दर्जेदार बियाने उपलब्ध करुन देवून शेतीतून भरघोस उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी अधिकारी यांची टीम सातत्याने प्रयत्नशील असून या माध्यमातून ९२९८ या वाणांचे २४०० की. हरभरा बियाने वाटप करण्यात आल.शिवाय ९२९८ हे वाण १०० ते १०२ दिवसात उत्पन्न मिळत असतो या सर्व बाबीचा aअभ्यास करुन दर्जेदार बियाने कृषी खात्याच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.यावेळी तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ ( नारनवर ) यांनी शेतकरी वर्गास उत्तम मार्गदर्शन केले.त्याच बरोबर वेळोवेळी त्यांस मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. 

          त्याच बरोबर कडधान्ये वाढण्यासाठी पी.एम.बी,रायझोबीयम,फेरोमेंट,त्याच बरोबर ट्रॅप वापर करण्यात येत आहे.तसेच विविध खते ही पुरविण्याचे काम कृषी खाते करीत आहे.त्याच बरोबर जमिनीचा पोत ही सुधारला जात आहे.यावेळी तालुका कृषी अधिकारी अर्चना ( नारनवर )सुळ ,मंडळ कृषी अधिकारी एम.ए साळके,कृषी परिवेक्षक - नितिन महाडीक,आत्मा अंतर्गत बीटीएम - प्रज्ञा पाटील, कृषी सहाय्यक- एम.एस.थळकरी,कृषी सहाय्यक-सी. आर सारंग,ग्रामपंचायत सदस्य - रवि म्हात्रे,शेतकरी मित्र शिवाजी ठाकूर,यांच्या माध्यमातूनहे कडधान्ये बियाणे वाटप करण्यात आले यामुळे कडधान्ये पिकात ४० टक्क्यांनी वाढ होण्यास मदत होण्यास मदत होइल.   

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास