बनारस/काशी

    हिंदु विश्‍वविद्यालयात प्राध्यापक फिरोज खान यांच्या संस्कृत विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून झालेल्या नियुक्तीला विरोध होत आहे.वरवर पाहता  हा विरोध निरर्थक आहे , असे कोणालाही वाटू शकते ; परंतु खोलवर जाऊन याचा मागोवा घेतल्यास असे लक्षात येते ,की डॉ. खान यांची नियुक्ती  ' संस्कृत विद्या आणि धार्मिक विज्ञान ' या विभागात करण्यात आली आहे .संस्कृत भाषा किंवा साहित्य आणि संस्कृत विद्या आणि धार्मिक विज्ञान  हे वेगवेगळे प्रांत आहेत. हे पद संस्कृत शिक्षकाचे नाही , तर हिंदु सिद्धांतरूप धर्मशास्त्राचे आहे . यात धर्मशास्त्र आणि कर्मांगे शिकवणे अपेक्षित आहे.अर्थातच  यासाठी नियुक्त शिक्षकाला वैदिककर्मकांडांचे सखोल आणि व्यापक ज्ञान असणे अपेक्षित आहे . आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्मकांडांतील  निहितार्थ समजून घेण्यासाठी नियुक्त शिक्षकाला वैदिक कर्मकांडे स्वतः आचरणात आणत  असणे आवश्यक आहे. आता तुम्हीच सांगा की , इस्लाम धर्म आचरत असलेले डॉ. फिरोज खान या पदासाठी पात्र ठरू शकतात का ?  

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...