भारतीय  अंतराळ संशोधन संस्था अर्थात  इस्रो ने पीएसएलव्ही-सी४७ अग्निबाण कारटोसॅट-३ आणि अमेरिकेच्या १३ व्यावसायिक नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रेक्षपण करुन अंतराळ क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. कारटोसॅट ३ हा उपग्रह अंतराळात भारताचा तिसरा डोळा ठरणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने पृथ्वीवरील एक फुटाच्या वस्तूचेही सुस्पष्ट छायाचित्र घेता येणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने भारताच्या भूभागावर तसेच शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवता येणार आहे. टेहळणीसोबतच नकाशे तयार करणे, शहरी नियोजन, ग्रामीण संसाधन आणि पायाभूत विकास, किनारी प्रदेशाचा नियोजनपूर्वक वापर करण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे. त्यामुळे देशातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी हा उपग्रह म्हणजे वरदान ठरणार आहे. 

   शिवाय या उपग्रहामुळे चीन पाकिस्तान या शत्रू राष्ट्रांवर तसेच भारताच्या हद्दीत अनधिकृतपणे घुसखोरी करणारी विमाने व जहाजे यांच्यावर देखील लक्ष ठेवता येणार आहे. एकूणच हा उपग्रह म्हणजे भारतासाठी अंतराळातील तिसरा डोळा ठरणार आहे. कारटोसॅट- ३ हा उपग्रह भारतीय अंतराळ संशोधनातील मैलाचा दगड आहे. हा उपग्रह अंतराळात यशस्वी प्रेक्षपित झाल्याने संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या इस्रोतील सर्व वैज्ञानिकांचे मनापासून अभिनंदन व आभार

अवश्य वाचा