सांगोाला

   सांगोला तालुक्यातील जवळे येथील प्रसिध्द म्हसोबा देवस्थान लोहगांव रस्ता पुर्णत: खराब झाल्याने वाहनचालक प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली आहे. संबंधित विभाग रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे.या रस्त्यानजीक प्रसिध्द असे म्हसोबाचे देवस्थान असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकभक्त येत असतात. जानेवारी महिन्यात याठिकाणी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशात खिलार जातीच्या जनावरांच्या बाजारासाठी प्रसिध्द आगलावेवाडी(जवळे)म्हसोबा देव यात्रा भरत असून या देवस्थानाकडे जाणार्‍या रस्त्याची प्रचंड दुरावस्था आहे. तसेच या रस्त्यावर दगड गोठेही वर आले असून रस्त्याच्या दुतर्ङ्गा काटेरी झाडांची बेसुमार वाढ झाल्याने वळणावरती वाहन चालकांना अंदाज येत नाही. तसेच या रस्त्यावरुन जाताना शाळकरी मुलांनाही या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

   सांगोला व जत आगाराच्या बसेस या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. तसेच जवळ्यासह दुरुन म्हसोबा देवस्थानला भेट देण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. प्रत्येक आमावास्येला बाहेरील तालुक्यातून, जिल्ह्यातून भाविकभक्त मोठ्या संख्येने म्हसोबा देवस्थानासाठी येत असल्याने जवळे ते म्हसोबा देवस्थान मार्गावर  वाहनांची वर्दळमोठ्या प्रमाणात असते. या रस्त्याची दुरुस्ती यात्रेपूर्वी करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली