पिकानुसार आणि कारणानुसार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी साधने बदलत असतात. पीक वाढीच्या विविध टप्प्यात वेगवेगळ्या पीक संरक्षक साधनांची गरज पडत असते. अशाच काही साधनांची माहिती पीक संरक्षक साधने या लेखात घेऊया.जमिनीत कीडनाशक सोडण्याचे साधन (सॉईल इंजेक्टर): या साधनांच्या उपयोग सूत्रकृमीसारख्या जमिनीत असलेल्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी असलेल्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी असलेली कीडनाशके जमिनीत सोडण्यासाठी करतात.या साधनात पंप, द्रावण किंवा वायू साठविण्यासाठी टाकी आणि कीडनाशक जमिनीत सोडण्यासाठी टाकीच्या खालच्या भागाला तीक्ष्ण टोक असलेली नळी जोडलेली असते.हाताच्या साहाय्याने हँडलवर दाब देऊन तीक्ष्ण सुमारे 35 ते 40 सें. मी. खोल जमिनीत जणू शकते.धूर निर्माते (फ्युमिगेटर्स किंवा सायनोगॅस फूट पंप): या साधनात भुकटी( कॅल्शिअम सायनाईड) ठेवण्यासाठी काचेचे पात्र, पंप, भुकटी सोडण्यासाठी नळी आणि लांब पायडा (फुटरेस्ट) असतो.पंपाने हवा खेचली जात व त्यामुळे काचेच्या पात्रातून हवा डिलिव्हरी नळीतून बाहेर पडते.

   या पडलेल्या भुकटीचा दामटपणाशी संबंध येऊन धूर निर्माण होतो.उंदराच्या किंवा वाळवीच्या बिळात विषारी धूर सोडण्यासाठी या साधनाचा उपयोग होतो.ज्वाला फेकणारे यंत्र (बर्ड स्केअरर):या साधनांचा उपयोग ठराविक अंतराने मोठा आवाज निर्माण करून पिकांवरील पक्षी व इतर प्राणी हुसकावून लावण्यासाठी करतात.या साधनात एक मोटेह व दुसरे लहान अशी दोन पात्रे असतात.लहान पात्रास एक पाईप पात्रात हवा येण्यासाठी जोडलेला असतो.लहान पात्र मोठ्या पात्राच्या साधारणपणे अर्ध्या उंचीवर येईल अशा पद्धतीने जोडलेलं असते.मोठ्या पात्रात वरच्या कप्प्यात साधारणपणे अर्ध्या उंचीवर येईल अशा पद्धतीने जोडलेलं असते.मोठ्या पात्रात वरच्या कप्प्यात पाणी ठेवलेले असते व खाली कॅल्शिअम कार्बाइडच्या भुकटीवर पडतील अशी व्यवस्था केलेली असते.कॅल्शिअम कार्बाइडचा पाण्याशी संपर्क आल्यावर ऑसिलिटिन हा स्फोटक वायू निर्माण होतो व हा वायू वरच्या कॅल्शिअम पात्रातील ज्वलन पोकळीत आल्यावर तेथील हवेच्या संपर्कात येऊन त्याचा स्फोट होतो व त्यामुळे मोठा आवाज निर्माण होतो.

   या आवाजाने शेतीतील पक्षी घाबरून उडून जातात. असे आवाज ठराविक अंतराने आपोआप होत राहतात.या प्रकारचे एक छोटे यंत्र 1 ते 2 हेक्टर क्षेत्रासाठी पुरेसे होते.बारा तासात दर 5 मिनिटांनी आवाज येण्यासाठी सुमारे 500 ग्राम कार्बाईड्ची भुकटी वापरली जाते.धुके निर्माण करणारे साधन (फॉग जनरेटर):या साधनाने फवार्‍याचे कण इतके सूक्ष्म होतात कि ते बराच काळ धुक्यासारखे हवेत तरंगत राहतात. ज्या ठिकणी पानांच्या दाटीमुळे सध्या पंपाने फवारले कण प्रत्येक पानाच्या सर्व भागापर्यंत जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी हे साधन उपयुक्त ठरते.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी