सांगोला:-

   विधानसभा निवडणूकीनंतर अद्यापही सर्वत्र सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्ष धावपळ करताना दिसत आहेत. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत आहे. आ.ओमप्रकाश उर्ङ्ग बच्चु कडू यांच्यामुळेच दिव्यांगांना न्याय मिळत आहे. अनेक ठिकाणी आजही दिव्यांगांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे दिव्यांगांनी स्वत:च्या हक्कासाठी लोकशाहीच्या मार्गाचे आंदोलनाचे शस्त्र हाती घ्यावे लागणार असल्याचे मत प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे विभाग अध्यक्ष राजाराम बंडगर यांनी व्यक्त केले. आ.ओमप्रकाश उर्ङ्ग बच्चु कडू प्रणित प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेची सन २०१९ ची वार्षिक आढावा बैठक सांगोला येथे सोमवार दि.२५ नोव्हेंबर रोजी पार पडली. यावेळी बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजाराम बंडगर बोलत होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सतीश दिडवाघ यांच्यासह नविद पठाण, अजीत काशिद, सागर गोडसे, आदि उपस्थित होते. दिव्यांग बांधवांना पूर्वी सरसकट ६०० रु.इतकी प्रतिमहिना पेन्शन मिळत होती. परंतु आ.ओमप्रकाश उर्ङ्ग बच्चु कडू यांच्या आंदोलनामुळे व पाठपुराव्यामुळे शासनाकडून ४० ते ७९ टक्के दिव्यांग असणार्‍या व्यक्तींना ८०० रु. तर ८० ते १०० टक्के दिव्यांग असणार्‍यांना १००० रु.पेन्शन सुरु करण्यात आली परंतु; सांगोला तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांना या शासकीय नियमाप्रमाणे पेन्शन दिली जात  नाही. यासाठी लवकरच संघटनेच्या वतीने सांगोला तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात येणार आहे.

   याप्रकरणी हलगर्जीपणा करणार्‍या संबंधीत कर्मचार्‍यांवरही कारवाई करुन नियमाप्रमाणे पेन्शन मिळाली पाहिजे. यासाठी सर्वांनी एकजूटीने स्वत:च्या हक्कासाठी काम करावे, असे मनोगत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना तालुकाध्यक्ष सतीश दिडवाघ यांनी व्यक्त केले. चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आ.ओमप्रकाश उर्ङ्ग बच्चु कडू यांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत करण्यात आला. तसेच पेन्शन योजनेबाबत जनजागृती करणे, ५ टक्के राखीव निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्यावर आंदोलनाद्वारे दबाब निर्माण करणे, घरकुल योजना यासह विविध विषयावर चर्चा करुन लवकरात लवकर आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत प्रवीण जगदाळे, लखन मंडले, किरण ठोकळे, यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रारंभी सन २०१९ मध्ये संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. संघटना वाढीसाठी दिव्यांग जनसंपर्क अभियान राबविण्याची मागणी उपस्थित दिव्यांग बांधवांनी केली. स्वागत विभाग अध्यक्ष कामदेव सरक यांनी केले तर आभार मनोज येलपले यांनी मानले. यावेळी सांगोला शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधव व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.