महाड-दि.२२ नोव्हेंबर

   संपुर्ण राज्या मध्ये रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणुन ओळखला जात होता,वाढते औद्योगिकरण,शेतीकडे होणारे दुर्लक्ष,वाढते प्रदुषण जमीनीचे विक्री व्यवहार या कारणांमुळे जिल्ह्यांतील भाताच्या शेतीचे प्रमाण दिवसे दिवस कमी होत असल्याने हजारो एकर जमीन ओसाड झाली आहे.महाड तालुक्यासह माणगाव,पोलादपुर तालुक्यांत अधिक प्रमाण असुन ओसाड जमीनीवर कशेळ या जातीच्या गवताने ताबा मिळविला असल्यामुळे हजारो जमीन नापिक झाली आहे.कशेळ गवताने भात शेतीच्या जमीनी मध्ये देखिल आक्रमण केल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.या समस्येवर तातडीने उपाय योजण्यांत यावेंत अशी मागणी शेतकNयां कडून केली जात आहे.

   महाड तालुक्यांतील खाडी विभागांमध्ये सावित्री नदीच्या किनारी शेकडो एकर भात शेती असुन या शेत जमीनीमध्ये नदीतील रासायनिक सांडपाणी गेल्याने हजारो एकर जमीन नापिक झाली आहे,या जमीनीवर कशेळ जातीच्या गवताचे आक्रमण झाल्याने बहूतांशी शेत जमीन पुर्णपणे नापिक झाली आहे.सुमारे सहा पुâटा पेक्षा उंच वाढत असलेले गवत उन्हाळ्यांतही राहाते,थोड्याच्या पावसाने पुन्हा या गवताला उभारी येते,ग्रामिण भागांमध्ये या गवताला ‘कशेळे’ या नावाने ओळखले जाते.या गवताचे बी वाNया बरोबर अन्य परिसरामध्ये पसरल्याने इतर जमीनींमध्ये देखील गवताची लागण होते,अल्पावधी मध्ये गवत पसरुन जमीन निरुपयोगी होत असल्याने शेतकNयाला शेता मध्ये भाताची लागवड करणे अशक्य होते.कशेळ गवत ही तालुक्यांतील शेतकNयांची डोकेदुखी बनली असुन या समस्येवर तातडीने उपाय योजण्याची आवश्यकता आहे.खाडी विभागांतील दादली या गावा पासुन थेट वराठी गावा पर्यतच्या सुमारे पंचवीस किलो मिटर अंतराच्या शेत जमीनीमध्ये कशेळ गवताने थैमान घातले आहे.

   या भागांतील सव,गोठे,वुंâबळे,रावढळ,तुडील,जुई,चिंभावे इत्यादी गावांतील घराच्या बाजुला,नाल्यातुन गटारातुन शेताच्या बांधावरुन या गवताचे आक्रमण होत असल्याचे आढळून येते.तालुक्यांतील खाडी विभागांमध्ये भाताच्या पिका नंतर कडधान्याचे पिक घेतले जात होते,आजही कडधान्याचे पिक घेतले जाते परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प झाले असल्याने शेतकNयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.महाड तालुक्यांतील प्रगतीशिल शेतकरी तुकाराम देशमुख म्हणाले,कशेळ जातीचे गवत भात शेतीला अतिशय धोकादायक आहे,तालुक्यांतील हजारो एकर जमीनीवर या गवताचे आक्रमण झाले असुन यावर अनेक प्रकारचे उपाय शेतकरी करीत असतो,शेतांमध्ये उगवलेले गवत अनेकदा जाळले जाते परंतु या गवताचे बी जमीनीमध्ये खोल वर रुजत असल्याने पावसाच्या पाण्यांत पुन्हा गवत तयार होते.

   गेल्या अनेक वर्षा पासुन या भागांतील शेतकरी तरुण शहरा मध्ये नोकरी काम धंद्या करीता जात असल्याने शेती उजाड झाली आहे.कांही ठिकाणी या गवताचा वापर जनावरांना चारा म्हणुनही वापरला जात असुन त्याचा कितपत फायदा मिळतो या बाबत शेतकNयांना कांहीच माहिती नसल्याचे वावे गावचे शेतकरी रज्जाक करबेलकर यांनी सांगितले.कृषी विभागाने तालुक्यांतील शेतीचे पाहाणी करावी आणि कशेळ गवत कश्या प्रकारे नष्ट करता येईल याची माहिती शेतकNयांना द्यावी अशी मागणी करबेलकर यांनी केली आहे.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी