शिव सेने भाजप युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांची महाआघाडी यांच्यानंतर महाराष्ट्रात कदाचित बनणाऱ्या नव्या आघाडी च पत्रकारांनी ठेवलेलं नाव!105 सदस्य घेऊन प्रथम क्रमांकावर आलेल्या भाजपला वगळून  50 या सदस्यसंख्येच्या आसपास असलेल्या तीन  पक्ष्यांच्या दिड विचारसरणी ची ही मोट बांधली जाईल?सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या आणि तरीही बहुमतापासून वंचित राहिलेल्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर पक्षांनी आपसातील तात्त्विक मतभेद विसरून एकत्र येण्याची ही काही पहिली वेळ नाही.असा पहा प्रयत्न 1977 ला  जनता पक्षाच्या स्थापनेच्या वेळी झाला होता ज्यावेळी समाजवादी , जनसंघ, आणि असंतुष्ट काँग्रेस नेते एकत्र येऊन काँग्रेस विरोधी पक्ष स्थपुन केला होता.पण हा पक्ष सत्तेवर आल्यानंतर आपसातील मतभेदांमुळे 28 महिन्यात सरकारसह गडगडला. नंतर चरण सिंग यांना काँग्रेसनीदिलेला पाठिंबा सात महिन्यात काढून घेतला.आधीच्या अनुभवांनी, 1989 साली पक्ष विलीन न करता मूळचे काँग्रेसी असलेल्या व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखालील जनता दल,कम्युनिस्ट आणि भाजप यांनी काँग्रेस विरोधी आघाडी करून केवळ 11 महिने सरकार चालविले. त्यानंतर काँग्रेसने पाठिंबा फिलेले सरकार केवळ 4 महिने चालले.काँग्रेसच्या नारसिह राव यांचे सरकार बहुमतापासून 30 ने दूर असूनही पाच वर्षे चालले.मात्र 1996 पासून देशात एक अस्थिरता बघायला मिळाली. आतापर्यंत काँग्रेस विरोधात एक होणारे पक्ष आता भाजपविरोधी म्हणून एक होऊ लागले .१९९६ ते ९८ या काळात भारताने चक्क तीन पंतप्रधान पाहिले.

   त्यांचा कालावधी 13 दिवसांपासून 9 महिन्यांपर्यंत होता.१९९८ पासून 2004 पर्यंत भाजपचे पंतप्रधान वाजपेयी सरकार टिकवू शकले तरीही मध्ये 1999 साली त्यांनाही अवघ्या तेरा महिन्यात मध्यावधी निवडणूक घ्यावी लागली होती.अगदी इतक्यात कर्नाटकात 80 काँग्रेसचे आणि 37जनता दल (से) सरकार सत्तेवर आल्यानंतर दि ड वर्षात कोसळले. यामागे 14 आमदारांचा भाजपने घडवून आणलेला राजीनामा हे कारण असले तरीही आपल्याकडे संख्या जास्त असूनही मुख्यमंत्री पद आपल्या कडे का नाही म्हणून कांग्रेस आमदार नाराज असणं हेही एक कारण होत.या नाराजीचाच फायदा घेत भाजपने 14 आमदारांचा राजीनामा घेतला.ही पाच ही उदाहरणे हेच दाखवतात की काँग्रेस जर सत्तेत प्रमुख स्थानी असेल तरच ते सरकार स्थिर राहत.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिव सेनेच्या 56 आमदारांच्या अर्थात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली येणार सरकार ज्यात राष्ट्रवादी चे 54 आणि काँग्रेसचे 44  असतील ते सरकार किती दिवस चालेल ही शंकाच आहे.हिंदुत्व, समान नागरी कायदा, रा म मंदिर यासारख्या विषयावर या तीन पक्षात कमालीचे मतभेद आहेत याशिवाय  शिवसेनेचे संस्थापक  बाळासाहेब ठाकरे यांच 'जर शिवसैनिकानी बाबरी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे असं  म्हणणं आणि सावरकरांना भारतरत्न देण्याला हुसेन दलवाई यासारख्या नेत्यांचा असलेला विरोध या गोष्टी पाहता हे सरकार अस्तित्वात आले तरी फार काळ टिकेल अस वाटत नाही.याच दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी यांची होऊ शकणारी युती त्याबदल्यात 2022ला पवारांना राष्ट्रपती पद यासारखे पतंग उडवले जात आहेत.

   पण फारसं काय अजिबात तथ्य नाही.महाशिवाघाडी आल्यास काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी चे जयंत पाटील यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागू  शकते आणि मार्च महिन्यात राज्यपालद्वारे नियुक्त होणाऱ्या 12 जागा, इतर मंत्री पदे हे तीन पक्ष वाटून घेऊ शकतात.पण शिवसेना आणि इतर दोन पक्षातील असलेला तात्विक विरोधाभास, शिवसेनेशी असलेल्या आघाडीमुळे काँग्रेसच्या दिल्ली आणि इतर राज्यातील मुस्लिम मतांवर होणारा परिणाम पाहता हे महाशिवआघाडी सरकार ये ण आणि टिक ण यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे.ही तीन पक्षांची खिचडी सध्या तरी बिरबलाच्या खिचडी प्रमाणे शब्दांच्या उबेवर बनत आहे. तिला एक महिना झाला तरीही वास्तविक तेची आच लागली नाही.  आणि जोपर्यत खरी आच लागत नाही तोपर्यंत ही खिचडी पकणार नाही. आणि को ग्रेसचा आधीचा अनुभव लक्षात घेता हे सरकार अस्तित्वात आल तरीही टिकण्याची शक्यता कमी आहे.याव्यतिरिक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी व्या दोन्ही पक्षातील पृथ्वीराज आणि अशोक या माजी मुख्यमंत्री असलेल्या चव्हाण जोडीला आणि राष्ट्रवादी तील अजीत पवार आणि छगन भुजबळ या उपमुख्यमंत्री जोडीला सांभाळणे आणि या चौघांच्या इगो ला धक्का लागू न देण्याची तारेवरची शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंना करावी लागणार आहे.याबरोबरच या दोन्ही पक्षात  ज्येष्ठ आमदार मंत्र्यांची मजबूत फळी आहे. त्यामुळे तीसुद्धा एक  डोकेदुखी ठरू शकते. त्याचबरोबर हे , राष्ट्रवादी  पक्ष मुख्यमंत्री पदावर आपला दावा किमान अडीच वर्षासाठी ठेवू शकतात. एकूणच ही बिरबलाची न पिकलेली खिचडी न ब नो ही सदिच्छा
   

अवश्य वाचा