सांगोला:-

   कायम दुष्काळाच्याझळा सोसलेल्या सांगोला तालुक्याला गेल्या काही वर्षापासून डेंग्यू सदृश्य आजाराने भलतेच पछाडले असून याचा धसका अनेक नागरिकांनी घेतला असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सरकार कुणाचे यापेक्षा सध्या थंडी-ताप कुणाच्या घरात याचीच चर्चा अधिक होत आहे. त्यामुळे सांगोला शहर व तालुक्यात लोकांमध्ये चर्चेचा विषय म्हणजे सरकार कोणत्या पक्षाचे नव्हे तर वाढत्या तापाच्या रुग्णांच्या संख्येवरुन ‘‘मच्छर चे सरकार आहे की काय’’,असा सवाल  उपस्थित होत आहे.परतीच्या पावसाने कधी नव्हे ते सांगोला तालुक्यातील नदी, नाले, ओढे, वगळ, तलाव, पाझर तलाव, भरले आहेत. तर अनेक शेत शिवारात अद्यापही पाण्याचा निचारा झाला नसल्यामुळे डेंग्यूच्या डासाला वातावरण व परिस्थिती भलतीच अनुकुल झाली आहे. याचा परिणाम म्हणून कुठेही, कधीही जावा डास मात्र प्रत्येक ठिकाणी गोंगावत असताना दिसत आहे.

   जिकडे-तिकडे डासच डास असल्याचे चित्र दिसत आहे.प्रत्येकाच्या घरात डास आहेच. त्याचबरोबर कोणत्याही शासकीय कार्यालयात गेले की, तेथेही डासांची उपस्थिती तात्काळ दिसते. चौकात, चावडीवर, रस्त्यावर, बागेत, अगदी ग्रामीणभागातील वाड्या-वस्त्यांवरही डास बहुसंख्येने असल्याचे दिसते.  याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. दिवाळीच्या सुरुवातीपासूनच तालुक्यातील अनेकांना ताप, थंडी, कोरडा खोकला, रक्तातीलपेशी कमी होणे, किंवा अचानक रक्तातील पेशी वाढणे, यासारख्या आजारांनी विळख्यात घेतले. बघता बघता डेंग्यू सदृश्य  आजाराचा धसका शहरासह तालुक्यात वाढतच आहे.डेंग्यू सदृश्य आजारामुळे काहीजणांचा मृत्यूही झाला असल्याची चर्चा तालुक्यात दबक्या आवाजात होत आहे. तिकडे सरकार बनवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाची धडपड असताना इकडे मात्र   ऽऽऽ....ऽऽऽ...एक मच्छर आदमी को डेंग्यूचा मरिज बना देता है | अशीपरिस्थिती निर्माण झाली आहे.

   डेंग्यू सदृश्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचार काय करावेत याविषयी नागरिकांमध्ये अद्यापही मार्गदर्शन व प्रबोधन ङ्गारसे होताना दिसत नाही.तापाचे प्रमाण सहजासहजी लक्षात येत नाही. विशेष करुन लहान मुलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्य विषयीच्या समस्या सहजासहजी कळत नसल्यामुळे तात्काळ यावर उपचार करणेही शक्य नसते. आजही लोकांमध्ये डेंग्यू सदृश्य आजाराविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. शहरातील नगरपालिकेचा आरोग्य विभाग व ग्रामीण भागातील आरोग्य विभाग यांच्या कारभारा विषयी ङ्गारसी समाधानकारक प्रतिक्रिया नागरिकांमधून नाही. जणू या सर्व आरोग्य विभागाचा कारभाराच डेंग्यू सदृश्य आजाराने ग्रस्त आहे की काय असाच संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली