सांगोला :-

   सांगोला-मिरज रोडवरील जुनोनी नजीक घडलेल्या तिहेरी विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर २ जण जखमी असल्याची घटना काल बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी घडली आहे. या अपघातात अजित रंगराव तुरुके, सागर रघुनाथ पडळकर दोघेही रा.कूकटोळी ता.कवठेमहंकाळ जि.सांगली असे मोटार सायकलवरील मरण पावललेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर अक्षय आनंदा जाधव रा. तारदाळ ता.हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर असे मयत झालेल्या पिकअप चालकाचे नाव आहे. जखमीमध्ये आण्णासोा मोरे (रा.रांगोळे ता.हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर), सुदाम खंडू पन्हाळकर (रा.नालवंडी ता.पाटोदा जि.बीड) यांचा समावेश आहे.

   नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचेे काम सुरू असून गेल्या काही दिवसापासून छोट्या-मोठठ्या अपघाताचे सत्र सुरू असून काल बुधवारी जुनोनी येेथे घडलेल्या अपघाताची चर्चा सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात होत होेती. रस्त्याची निर्मिती अनेकांच्या जिवाची बळी घेणारे ठरत असल्यामुळे वाहन धारकांनाही आता जरा जपूनच वाहने चालवावी लागणार आहेत. मोटारसायकलसह दोन्ही पिक अपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत  सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश गवळी यानी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अवश्य वाचा

मुरूड - अलिबाग बस नादुरुस्त...