राष्ट्वादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण येणे आपण समजू शकतो. शरद पवार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मोदींना भेटले असे जरी सांगण्यात  आले तरी त्यावर फारसा कुणाचा विश्वास बसणार नाही. अर्थात मोदी व पवारांची वैयक्तीक मैञी आहे व ती त्यांनी कधीच लपवून ठेवलेली नाही. तशी प्रत्येक पक्षातील नेत्यांशी पवारांची मैञी आहे. मोदींशी जरी पवारांशी मैञी असली व यापूर्वी बारामतीत येऊन मोदींनी शरदरावांची मुक्तपणाने स्तुती केली असली तरी पवारांनी अजूनपर्यंत मोदींच्या पक्षाशी राजकीय हातमिळवणी केलेली नाही. त्यामुळे सध्याच्या महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय वातावरणात ही भेट झाल्याने विविध गॉसिप रंगू शकतात. शरद पवारांशी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदीशी चर्चा केली असणारच, माञ पवारांच्या आंगात राजकारण भिनलेले असल्याने त्यांनी मोदींशी राजकीय संदर्भात शंभर टक्के चर्चा केलीच असणार याबाबत तीळमाञ शंका नाही. अर्थात बंद खोली आड कोणती चर्चा झाली हे समजणे शक्य नाही. माञ आपण काही तर्क लढवू शकतो. यातील पहिली शक्यता भाजपा-शिवसेनेचे पुन्हा सरकार येण्यासाठी काही तोडगा पवार काढू शकतात. किंवा शिवसेनेचा मुख्यंञीपदाबाबत असलेला आग्रह व त्यांची भाजपाच्या नेत्यांनी कशी फसवणूक केली हे स्पष्ट करु शकतात.

    त्यांचे सरकार पुन्हा येण्यासाठी काही तोडगा पवार काढू शकतात. कारण सुरुवातीपासून पवार युतीलाच बहुमत आहे व त्यांनीच सरकार स्थापावे असे सांगत आहेत. कदाचित पवारांनी दोन्ही पक्षांना मान्य होईल असा तोडगा सुचविला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी शक्यता नाईलाज म्हणून आम्हाला सरकार स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा लागत आहे असे सांगून महाशिवआघाडीचे सरकार यावे असे सांगू शकतात. माञ यासंदर्भात कॉंग्रेसचे तळ्यात मळ्यात असे सुरु असल्याने पवारांच्या मोदी भेटीने कॉंग्रेसवर दबाव येऊ शकतो. आता जर कॉंग्रेसच्या ढिलेपणामुळे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाले नाही तर त्याचा राज्यात सर्वाधिक फटका कॉंग्रेसलाच बसणार आहे. कॉंग्रेसच्या वर्तुळात असे बोलले जाते की, सोनिया गांधी या आघाडीला तयार आहेत, माञ राहूल गांधी यांचा विरोध आहे. कारण केरळ कॉंग्रेसला ही आघाडी नको आहे. राजीव गांधी केरळातून निवडून आल्याने तेथील मत डावलू शकत नाहीत. यामागची कारणे काही असोत, ही आघाडी न झाल्यास भाजपाला राज्यात एकटे पाडण्याची संधी पुन्हा कॉंग्रेससाठी चालून येणार नाही. पवारांच्या या भेटीमुळे कॉंग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्याचबरोबर तिसरी शक्यता अशी आहे की, या चर्चेत पवारांनाच भाजपा-राष्ट्वादी आघाडी करण्याचा प्रस्ताव मोदींनी दिला असावा. त्यासंबंधी  जी गॉसिप रंगत आहेत त्यानुसार, पवारांना उपराष्ट्पतीपद हे देऊन केंद्रात व राज्यात मंञीपदे बहाल करणे असा तो प्रस्ताव. असा प्रस्ताव मोदींतर्फे दिला जाऊ शकतो. परंतु सध्याच्या स्थितीत पवार तो स्वीकारणार नाहीत. फक्त हा प्रस्ताव न नाकारता आपल्या खिशात ठेऊ शकतात.

    पवारांना उपराष्ट्पती पद कधीच स्वीकार्हार्य वाटणार नाही. कारण ते पक्के राजकारणी आहेत व मरेपर्यंत अशा मानाच्या पदासाठी राजकारण सोडू शकत नाहीत. त्यामुळे पवारांना ही ऑफर स्वीकार्हार्य वाटणार नाही. सध्या राज्यात अशी स्थिती आहे की शिवसेनेप्रमाणे राष्ट्वादीही मंञीपदांसाठी अडून बसू शकते. त्यांना भाजपाबरोबर जाऊन सर्व राजकारण उलटे फिरविण्यापेक्षा महाशिवआघाडी करणे राजकीयदृष्ट्या कर्मफरटेबल ठरणार आहे. त्यामुळे मोदींच्या या प्रस्तावावर पवार काही राजी होणार नाहीत. माञ हा प्रस्ताव झुगारुन देणेही शहाणपणाचे ठरणार नाही. त्यावर ते भाजपाला अजून काही वर्ष झुलवू शकतील. पवारांच्या या भेटीमुळे माञ त्यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले आहे. पवार नावाची शक्ती केवळ राज्यात नाही तर देशात कार्यरत आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. दिल्ली दरबारी मराठी राजकारण्याचे कुणाचेच एवढे वजन नाही. राष्ट्वादी संपविण्याची तसेच पवारांनी निवत्ती देण्याची भाषा राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी केली होती ती किती पोकळ होती हे आज सिध्द झाले आहे. या भेटीमुळे शेतकऱ्यांचे किती भले होणार हे काळ ठरविल. माञ राज्यातील सत्ता स्थापनही काही झपाट्याने होईल असे वाटत नाही.

    राजकारण हे खूप प्रवाही असते. परंतु त्यात वैचारिक बांधिलकीही जपली जाते. तर कधी वैचारिक बांधिलकीही गुंडाळून ठेवली जाते व देशहिताचे कारण दाखवत सत्तेला सलाम केला जातो. जॉर्ज फर्नांडिसांपासून रामदास आठवले अशी अनेकांचा उदाहरणे देता येऊ शकतील. शरद पवार नावाचा हा स्टॉंगमँन याच दिशेने जाणार की भाजपा विरोधी सेक्युलर राजकारणाच्या अग्रभागी राहाणार हे नजिकच्या काळात समजेल. पवारांची ही मोदी भेट नजिकच्या काळात राजकारणाची दिशा बदलणारी ठरेल किंवा नाही ते  लवकरच समजेलच. राज्यातील नव्या सरकारच्या स्थापनेतील बीजे आजच्या या बैठकीत रोवली जाऊ शकतात हेही तितकेच खरे.

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...