सांगोला 

दर रविवारी भरणार्‍या सांगोला आठवडा बाजारात वाढत्या मोबाईल चोरींच्या घटनामुळे नागरीकांमधून मोठ्या प्रमाणात सांगोला पोलीसांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात होता. यामुळे सांगोला पोलीसांनी रविवार दि. १७ नोव्हेंबर  रोजी आठवडा बाजारात चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी व मोबाईल चोरीला आळा घालण्यासाठी होमगार्डना सोबत घेऊन सकाळी बाजार सुरु झाल्यापासून ते रात्री उशीरा बाजार संपेपर्यंत चोरांची विकेट घेण्यासाठी जणू जोरात ङ्गिल्डींग लावली असल्याचे दिसून आले.

दिवाळीपासूनच आठवडा बाजारातील मोबाईल चोरींच्या घटना प्रचंड वाढलेल्या होत्या. महागडे हजारो रुपयें किमतींचे मोबाईल हातोहात चोरीस जाण्याच्या घटनांमुळे बाजारात येताना मोबाईल धारकांनाही चोरांचा धसका घेऊन यावे लागत होते. गर्दीच्या ठिकाणी संधी सांधून वरच्या खिशात ठेवलेले मोबाईल केव्हा चोरीस गेले हेही कळत नव्हते. तसे पाहता नागरिकांच्या हलगर्जीपणामुळेही चोरांसाठी वरचा खिशा म्हणजे चोरीचा हक्काचा खिसा बनला होता. बाजारात आल्यानंतर बहुतांशी ज्या नागरिकांच्या वरच्या खिशात महागडे मोबाईल आहेत त्याच्यावर नजर ठेऊनच मोबाईल चोरुन आठवडा बाजारातून तात्काळ चोर निघुन जात असे.

वाढत्या मोबाईल चोर्‍यांमुळे नागरिकच काय तर सांगोला पोलीसांनाही काय करावे? हेच सुचेना. वरच्या खिशात मोबाईल ठेवला ही नागरिकांची चूक का? हीच आयती संधी  साधून मोबाईल चोरुन घेऊन जाणार्‍यांची चूक. पण याचा रोष मात्र पोलीसांनाच सहन करावा लागत होता. ङ्गिर्याद द्यावयास गेल्यानंतर मिळणारी वागणूक नक्कीच नागरिकांसाठी आश्‍चर्यकारक होती. परंतू पोलीसांच्या कार्यक्षमतेला अनेक वेळा मर्याद पडत असल्यामुळेच चोरांचा बंदोबस्त करायचा तरी कसा? हेही न सुटलेले कोडेच बनले आहे. कालच्या आठवडा बाजारात जिकडे नजर जाईल तिकडे साध्या पोशाखातील पोलीस तर अनेक होमगार्ड बाजारातील सर्व घटनांवर बारकाईने नजर ठेवत असल्याचे दिसून येत होते. ग्रामीण भागातील आलेल्या नागरिकांसाठी मात्र हा विषय चर्चेचाच बनलेला होता. काय भानगड आहे आज सगळे साहेबच बाजारात दिसत आहेत. अशी चर्चा बाजारासाठी आलेल्या नागरिकांमधून होत होती. तर दुसर्‍या बाजूला परराज्यातून व परजिल्ह्यातून सांगोला तालुक्यात पोटासाठी विविध कामांवर आलेल्या चौकशी यावेळी बाजारात केली जात होती. साहजिकच रविवारी दिवसभर आठवडा बाजारात सांगोला पोलीस व होमगार्ड यांची जोरात ङ्गिल्डींग दिसत होती. परंतू एवढी दमदार ङ्गिल्डींग लावूनही चोरांची विकेट पडली की नाही हे लवकरच कळेल.

अवश्य वाचा