सांगोला :-

   शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, यांचे प्रश्‍न सोडविण्याचा शेकापक्षाने सातत्याने प्रयत्न केला आहे. देशाच्या विकासाचा मार्ग शेतीमधून जातो. जोपर्यंत शेतीचा विकास होत नाही, शेतमालाला किङ्गायतशीर भाव मिळत नाही, आणि शेतकर्‍यांचे जीवन सुधारणार नाही तोपर्यंत या देशाचा विकास झाला असे शेकापक्ष मानणार नाही. यासाठी  गावोगावच्या शेकापक्षाच्या गाव कमिट्या आणि पुरोगामी युवक संघटनांचे पुनर्जीवन करुन त्या बळकट करणे गरजेचे आहे. हाच एकमेव मार्ग शेकापक्षाची ताकत वाढविण्याचा असून आपण  संघटनेच्या जोरावरच प्रश्‍न सोडवीत असल्याचे प्रतिपादन भाई गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले.शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा काल शनिवारी दुपारी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाई गणपतराव देशमुख बोलत होते.

   यावेळी, महानंदा दूध संघाचे संचालक चंद्रकांत देशमुख, चिटणीस विठ्ठलराव शिंदे, चेअरमन नानासाहेब लिगाडे लेबर फेडरेशनचे बाबा कारंडे, माजी पोलिस अधिकारी भरत शेळके, पुरोगामीचे तालुकाध्यक्ष दीपक गोडसे, सभापती श्रुतिका लवटे, आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलत असताना भाई गणपतराव देशमुख म्हणाले, शेतकर्‍यांची सर्व कर्जे माफ करावीत, ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकर्‍यांची वीजबीले माफ करावीत, शेतकर्‍यांचे पीकविम्याचे पैसे त्वरीत मिळावेत, छावणी चालकांची थकीत बीले त्वरीत द्यावीत, या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या  मान्य करुन घेण्यासाठी शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावे लागेल. गत निवडणुकीत सांगोला मतदारसंघातील मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला ९८ हजार पेक्षा अधिक मतदान केले.

   त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो.डॉ.अनिकेत देशमुख बोलताना म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीच्या अगोदरपासूनच विरोधकामध्ये भीतीचे वातावरण होते की, आ.गणपतराव देशमुख यांच्या सारखेच परत ५० वर्ष मी आमदारकी मिळवतो की काय असे असताना तालुक्यातील सर्व विरोधक एकत्र झाले. माझा निसटता पराभव झाला असला तरी मला तालुक्यातील मतदारांनी भरभरुन प्रेम देत ९८ हजार ६९६ मते देवून एकप्रकारे विजयीच केलेले आहे. तर दुसर्‍या बाजूला सर्व विरोधक एकत्र आले आहेत. परंतु अनेक ठिगळे लावलेली ही विरोधकांची चादर ङ्गारकाळ टिकणार नाही. शेतकरी कामगार पक्षाला मिळालेले मतदान हे निर्विवाद मिळालेले मतदान आहे. त्यामुळे आजही सांगोला तालुक्यात शेकापक्ष प्रबळच आहे. सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य गरीब व दलित बहुजन आजही आपल्याच बाजूने असल्यामुळे येणार्‍या नजीकच्या काळात त्यांच्यासाठीच मोठा लढा उभारुन विकासात त्यांना सहभागी करु.सदरच्या मेळाव्यास बाबा कारंडे, विनायक कुलकर्णी सर, ऍड.सचिन देशमुख, नंदकुमार शिंदे, पं.स.सभापती श्रुतिका लवटे, गलांडे सर, माजी सभापती पाटील, संतोष देवकते, चंद्रकांतदादा देशमुख, भरत शेळके, दीपक गोडसे, यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यामध्ये स्वागत तालुका चिटणीस विठ्ठलराव शिंदे तर प्रास्ताविक प्रा.नानासाो लिगाडे यांनी केले.

   सदरच्या मेळाव्यास मार्केट कमिटीचे चेअरमन गिरीश गंगथडे, खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन विलासराव देशमुख, गजेंद्र कोळेकर, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, नगरसेवक गजानन बनकर, रफिक तांबोळी, सुरेश माळी, चिदानंद स्वामी, यांच्यासह आदी उपस्थित होते.या मेळाव्यास शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटनेने कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग